While inaugurating the Marathi Gazal Conference, Gazalkar Dr. Shivaji Kale
While inaugurating the Marathi Gazal Conference, Gazalkar Dr. Shivaji Kale esakal
जळगाव

Jalgaon News : अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला : डॉ. शिवाजी काळे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कविवर्य व गझलसम्राट सुरेश भट यांची गझलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या व जुन्या गझलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे. गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार आहे. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा जरी मराठी गझलचा प्रवास झाला असला तरी अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला आहे, असे प्रतिपादन गझलकार डॉ. शिवाजी काळे (राशीन जि. अहमदनगर) यांनी जळगावात एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे उद्घाटक म्हणून केले. (Jalgaon One day Marathi ghazal meeting)

गझल मंथन साहित्य संस्था, खानदेश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे येथे आज खानदेश विभागीय एक दिवसीय मराठी गझल संमेलन झाले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील संमेलनाध्यक्ष होते.

प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून गझलकार नीलेश कवडे (अकोला) तर संदीप वाकोडे(मूर्तिजापूर), ऊर्मिला बांदिवडेकर, सच्चिदानंद जाधव, युवराज माळी हे उपस्थित होते. गझल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गझलेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे.

नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय स्तरावर गझल संमेलन आयोजित केले जात आहेत, अशी माहिती प्रास्तविकेतून संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिली. कवी ॲड. मुकुंदराव जाधव यांचा "फुलला सुगंध प्रेमाचा.." या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. शिरपूर येथील अनिता खैरनार यांना "गझल यात्री सन्मान" पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (latest marathi news)

संमेलनाध्यक्ष पाटील यांनी, गझल हा कष्टसाध्य काव्यप्रकार आहे. गझल शिकण्यासाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शकांची आवश्यकता असते असे सांगून, कालानुरूप आधुनिक गझलेचा लोकाभिमुख लहेजा आणि बदललेला आशयविषय याविषयी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन काशिनाथ गवळी यांनी केले.

सहभागी गझलकारांना गौरविण्यात आले. गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, खानदेश विभाग अध्यक्ष काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष अॅड. मुकुंदराव जाधव, बाळासाहेब गिरी, यशश्री रहाळकर, अतुल देशपांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, शिवाजी साळुंखे, मंजूषा पाठक, सुदाम महाजन, डॉ. शकुंतला चव्हाण आदींनी सहकार्य केले.

संमेलनाच्या उद्घाटनानंतर विविध सहा सत्रांत मुशायरा घेण्यात आला. गझलकार डॉ. कैलास गायकवाड, विजय वडवेराव, रावसाहेब कुवर, विजय पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, वीरेंद्र बेडसे या नामांकित गझलकारांनी विविध सत्रात संपन्न होणाऱ्या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद भूषविले. गझलकार राज शेळके, संदीप पटेल, डॉ. कुणाल पवार, छाया सोनवणे, आशा साळुंके, ज्योती वाघ यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT