Inspector Pradeep Thakur, police personnel Ishwar Chavan, Suresh Medhe, Saadhan Thakur, Sachin Ghuge etc. along with motorcycles seized by police. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोरीच्या 5 मोटारसायकलींसह रावेर पोलिसांकडून एकजण ताब्यात

Jalgaon Crime : पोलिसांनी एका मोटरसायकल चोराला अटक करून त्याच्याकडून पाच विविध कंपन्यांच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पोलिसांनी एका मोटरसायकल चोराला अटक करून त्याच्याकडून पाच विविध कंपन्यांच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर रुजू झाल्यापासून अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत सुरू आहे. त्यानंतर मोटरसायकल चोरीचा गुन्हा रावेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित अजय वाघोरे (वय २७, रा. भोर रेल्वेस्टेशन, रावेर) याने एक फॅशन प्रो कंपनीची (एमएच १९, बीआर ५२६९) ही मोटरसायकल चोरून आणलेली आहे. (Jalgaon One person arrested by Raver police along with 5 stolen motorcycles)

पोलिसांनी चौकशीअंती त्याच्याकडून सात हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची फॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल (एमएच १९, बीआर ५२६९) ३५ हजार रुपये किमतीची एक होंडा शाईन मोटारसायकल (एमएच २८, एएक्स २५०५), तर २२ हजार रुपये किमतीची एचएफ डिलेक्स कंपनीची विना नंबर.

३६ हजार रुपये किमतीची एक होंडा शाईन विना नंबर, २८ हजार रुपये किमतीचे एक फॅशन प्रो विना नंबर मोटार सायकली अशा एकूण पाच मोटार सायकली रावेर पोलिस प्रशासनाने जप्त केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. (latest marathi news)

...यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलिस अधीक्षक (फैजपूर) अन्नपूर्णा सिंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण.

सुरेश मेढे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, अमोल जाधव, सुकेश तडवी, तथागत सपकाळे, विकार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT