Pachora Bus Station. Bikes parked at the entrance of Pachora Bus Stand. esakal
जळगाव

Pachora MSRTC Depot : खिळखिळ्या बसगाड्यांमधून जीवघेणी कसरत! अनेक वर्षांपासून जुन्याच गाड्या वापरात

MSRTC Depot : मराठवाडा भाग जवळ असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी जुन्या गाड्यांमधून जीवघेणा प्रवास प्रवाशांना करावा लागत आहे.

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा : येथील बस आगार जिल्ह्यातील समाधानकारक उत्पन्न देणारे आगार मानले जाते. मराठवाडा भाग जवळ असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी जुन्या गाड्यांमधून जीवघेणा प्रवास प्रवाशांना करावा लागत आहे. सद्यःस्थितीत विविध समस्यांच्या फेऱ्यात हे आगार वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. आगाराचा परिसर आकर्षक, सुशोभित व स्वच्छ केल्यास शहराच्या वैभवात भर पडण्यास मदत होणार आहे. (Pachora MSRTC Depo life threatening from buses And cars have been in use for many years )

शहरातील जारगाव चौफुली लगत शिवाजीनगर भागात आगाराचा प्रशस्त व मोकळा परिसर आहे. सद्यःस्थितीत आगारात ५४ बसगाड्या असून १३० चालक व १२० वाहक दिवसभरात अनेक फेऱ्या करुन सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करतात. त्यातून आगाराला चांगले उत्पन्न मिळत असल्याचा इतिहास आहे. आगाराला सध्या दर दिवशी साडेचार लाखांचे उत्पन्न मिळत असले तरी विविध सण, उत्सव व यात्रांच्या काळात यात मोठी वाढ होते. ज्यातून आगाराला चांगले उत्पन्न प्राप्त होते. महिलांसाठी ५० टक्के तिकीटदराच्या धोरणानंतर आगाराची आर्थिक उलाढाल वाढली आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्या

पाचोरा आगारातून पुणे, नाशिक, कल्याण, सुरत या लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातात. आषाढी व कार्तिकी यात्रेप्रसंगी पंढरपूर तसेच नवरात्रोत्सवात वणी (नाशिक) गडावर बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते.

आगाराचे नूतनीकरण

गेल्या काही वर्षांपूर्वी सुमारे २५ लाखांच्या निधीतून आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, तरीही प्रवाशांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सुविधा नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून सातत्याने केल्या जातात. बस स्थानकासमोरील फायबरचे छत पहिल्याचवर्षी वादळाने उडाले. त्यानंतर त्याची दुरुस्तीच झालेली नाही. बस स्टँडच्या परिसरात आजूबाजूचे दुकानदार सर्रास घाण टाकत असल्याने मोकाट जनावरांचा या ठिकाणी वावर असतो. ज्यामुळे आगाराच्या आवारात दुर्गंधी पसरलेली असते.

नवीन गाड्यांची प्रतीक्षा

आगारात गेल्या अनेक वर्षांपासून नवीन गाड्या आलेल्या नाहीत. गाड्यांची संख्या कमी झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातीलच काही आगारांच्या गाड्या येथील आगाराला पुरविण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या गाड्या आगारातून सोडण्यात येत असल्या तरी एकही शिवशाही बस आगाराला प्राप्त झालेली नाही. सध्या आहे त्या गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट व जीवघेणी बनली आहे. बऱ्याच बसगाड्या प्रवासा दरम्यान नादुरुस्त होतात.

पाण्याची सुविधा

स्थानकात पीपल्स बँकेतर्फे पाणपोई उभारण्यात आली असून, ती प्रवाशांसाठी संजीवनी ठरली आहे. त्यात आत व बाहेर वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीचा त्रास होत असतो. तसेच येथील पाणी योग्य प्रकारे शुद्ध होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वाढल्या आहेत. उन्हाळ्यात विविध सेवाभावी संस्था, संघटनांतर्फे आगार परिसरात पाणपोई लावून प्रवाशांची तहान भागवली जाते. (latest marathi news)

''महाविद्यालय व संगणक क्लासेससाठी आम्ही बसने अप-डाऊन करतो. बऱ्याचदा अधिकृत थांब्यावर बस थांबत नसल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होतो. निदान विद्यार्थ्यांसाठी तरी थांब्यावर बस थांबवल्या जाव्यात.''- वृषाली सोमवंशी, विद्यार्थिनी ः पाचोरा

''बऱ्याच बसगाड्या नादुरस्त झालेल्या आहेत. प्रवास करताना बसमध्ये प्रचंड आवाज येतो. गाड्यांना वेगही नाही. त्यामुळे गाड्यांची दुरुस्ती व्हावी. नवीन गाड्यांचा आगारास पुरवठा व्हावा.''- संतोष पाटील, प्रवाशी ः पाचोरा

''बसस्थानकावर परिपूर्ण सुविधा देण्यासंदर्भात नियोजन असते. कोणतीही फेरी लेट होऊ नये, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. सफाई कर्मचारी, वीज समस्या, पोलिस मदत यासाठी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. नवीन बस गाड्यांची मागणी देखील केली आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक गाड्यांसाठीचे चार्जिंग पॉइंट उभारणीचे काम आगार परिसरात प्रगतीपथावर आहे. प्रवाशांच्या समस्या व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन लगेचच सोडवणूक केली जाते.''- प्रकाश पाटील, आगार व्यवस्थापक ः पाचोरा

...या आहेत समस्या

- स्वच्छता कर्मचाऱ्याचा अभाव

- पोलिस मदत केंद्र रिकामे

- हिरकणी कक्ष ‘शो पीस’

- विजेची समस्या कायम

- काही दिवे व पंखे नादुरुस्त

- वाहक चालक आराम कक्षात असुविधा

- दिव्यांगांसाठी रॅम व इतर सुविधा नाही

- शौचालयासाठी ‘पे ॲड यूज’चा भुर्दंड

- वेळा पत्रकाची दुर्दशा

- आगारातील कॅन्टीन बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT