Jalgaon Pachora Municipality 14 wards 28 reservation announced sakal
जळगाव

जळगाव : पाचोरा पालिकेच्या प्रभागांतील आरक्षण सोडत जाहीर

१४ प्रभागातून प्रत्येकी दोन याप्रमाणे २८ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील पालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, पालिका सभागृहात आज दुपारी काढण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल पीठासन अधिकारी म्हणून होते. पालिकेच्या १४ प्रभागातून प्रत्येकी दोन याप्रमाणे २८ सदस्य संख्या यापूर्वीच निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आरक्षण काढण्यात आले. गो. से. हायस्कूलच्या पाचवीतील देवांश महाजनव सहावीतील गीत महाजन यांच्याहस्ते चिठ्ठी काढण्यात काढण्यात आली.

प्रभाग निहाय आरक्षण असे ः प्रभाग १ (अ)- अनुसूचित जाती महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग २ (अ)- अनुसूचित जाती महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग ३ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग ४ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग ५ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग ६ (अ)- अनुसूचित जमाती, (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ (अ)- अनुसूचित जाती, (ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण, प्रभाग ९ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग १० (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग ११ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग १२ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण, प्रभाग १३ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण प्रभाग १४ (अ)- सर्वसाधारण महिला, (ब)- सर्वसाधारण. असे आरक्षण निघाले. या आरक्षण सोडतीवर हरकती व सूचनांसाठी १५ ते २१ जून दरम्यानचा कालावधी दिला आहे. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले यांच्यासह शिवसेनेचे मुकुंद बिल्दीकर, गणेश पाटील, किशोर बारावकर, मनोज पाटील, प्रवीण ब्राह्मणे, भूषण पेंढारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजहर खान, ॲड. अविनाश सुतार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: 10 जुलैचे अपडेटेड पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर! कच्चे तेल महागल्यानंतर आता लिटरसाठी किती पैसे लागणार?

तारीख ठरली! बिग बॅश लीगची मॅच चेन्नईत; क्रिकेट इतिहासात प्रथमच असं घडणार, वाचा कोणते संघ भारतात येणार...

Latest Marathi News Live Update : साक्री-शिर्डी मार्गावर कार दुभाजकावर आदळली... कार चालक गंभीर जखमी

Google Play Store चा नवा लूक; Games आणि Appsचे डिझाइन बदलले

Mirya Nagpur Highway : 4 किमी लांब बोगदा अन् 100 कोटींचा उड्डाणपूल! नितीन गडकरींचा कोकणासाठी मास्टरप्लॅन, मिऱ्या-नागपूर महामार्गाचा प्रवास होणार सुसाट!

SCROLL FOR NEXT