Farmers cultivating agriculture in Shivara  esakal
जळगाव

Jalgaon News: धरणगाव तालुक्यात 45, 563 हेक्टरवर लागवड प्रस्तावित! शेतजमीन तयार; पेरणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

Jalgaon News : आतापर्यंत केवळ ८९२ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. कडक उन्हाळा असल्याने यंदा मेमध्ये कापसाची लागवड फार कमी झाली आहे.

प्रा. डी. सी. पाटील

धरणगाव : तालुक्यात मृगाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा असून, या वर्षी खरिपाची ४५,५६३ हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. आतापर्यंत केवळ ८९२ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. कडक उन्हाळा असल्याने यंदा मेमध्ये कापसाची लागवड फार कमी झाली आहे. (Jalgaon Plantation proposed on 45563 hectares in Dharangaon taluka)

प्रत्येक वर्षी मृग नक्षत्रात पाऊस येतो. मात्र, तो अत्यल्प प्रमाणात असतो. पेरणीसाठी आवश्‍यक असलेला दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नांगरटी व वखारणी करून, काडी कचरा वेचून शेती पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

अनेकांची शेती तयार आहे. बैलजोडीची किमत वाढल्याने अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही. त्यामुळे रोजंदारी व उसनवारीवर बैलजोडी आणावी लागते. मात्र, बैलजोडी उपलब्ध होत नसल्याने बहुतेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून शेतीत मशागती करीत आहेत.

बियाणांची प्रतिक्षा

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक शेतकऱ्यांकडून खते, बी-बियाण्याची खरेदी सुरू आहे. मात्र, पाहिजे त्या कंपनीचे मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. काही बियाण्यांचा काळाबाजारही होत असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. धरणगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य दरात शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे.

खरीप हंगामासाठी पिकांचे सूक्ष्म नियोजन आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून कंपोस्ट खते व ग्रीन मॅनोरिंग, अशा जैविक घटकांचा वापर करून खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी व जमिनीचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (latest marathi news)

मका लागवडीला प्राधान्य

हमीभावाचे उत्पादन म्हणून शेतकरी कापूस आणि मका या पिकांकडे पाहतो. त्यामुळे तालुक्यात कापूस आणि मक्याची लागवड जास्त होण्याची शक्यता आहे.

"धरणगाव तालुक्यात बी-बियाण्यांची कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना आवश्यक वाणांची उपलब्धता करून देण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय बियाण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही."-चंद्रकांत देशमाने, कृषी अधिकारी, धरणगाव

"खरीप हंगामासाठी शेत तयार करून ठेवले आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा विहीर, कूपनलिकांना पाणी नसल्याने मेमध्ये लागवड अत्यल्प केली. पाहिजे ते बियाणे मुबलक प्रमाणात मिळत नाही. ते वाढीव दराने घ्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते."

-मोहनराव पाटील, शेतकरी, कमतवाडी (ता. धरणगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT