Police Recruitment  esakal
जळगाव

Jalgaon Police Recruitment : पोलिस भरतीच्या नव्या अटीमुळे अडचण; भरतीसाठी डॉक्टर, एमबीए उमेदवारांचे अर्ज

Police Recruitment : भरतीसाठी चक्क डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षितांचे अर्ज आले आहेत.

उमेश काटे

Jalgaon Police Recruitment : बेरोजगारीमुळे सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून पोलिस भरतीसाठी चक्क डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्च शिक्षितांचे अर्ज आले आहेत. राज्यभरातून पोलिस भरतीसाठी १७ हजार ४७१ पदांसाठी तब्बल १७ लाख ७६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. मात्र यात प्रशासनाने पोलिस भरतीसाठी एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. ()

असा नवीन नियम आणला आहे. हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत भरतीसाठी अर्ज भरल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. पोलिस भरतीसाठी तर चक्क डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांचे अर्ज आले आहेत.

या प्रक्रियेत अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज केले आहेत. परंतु आता त्यांना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी हमीपत्र द्यावे लागणार आहे. उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास तो सोयीचा जिल्हा निवडतो. परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. (latest marathi news)

प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची अट करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत, त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केली आहे.

त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलिस कार्यालयात १७ मे २०२४ पर्यंत हे हमीपत्र देणे आवश्यक आहे. आता उमेदवाराच्या केवळ एकाच अर्जाला प्राधान्य दिले जाईल. हमीपत्रात उमेदवाराने कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा तपशील द्यावा लागणार आहे. तसेच त्याने किती अर्ज केले आहेत आणि ते कुठे कुठे केले ही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी त्यास द्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation: ‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; समाज गप्प बसणार नाही’

Teacher Recruitment: शिक्षक मेगाभरतीत मोठा गोंधळ! पवित्र पोर्टल हँग, पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत जवळ

Crop Insurance: पीक विम्याची मुदतवाढ मिळाली, पण संकेतस्थळच डाऊन; पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर विमा संरक्षणाचे संकट

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

SCROLL FOR NEXT