Police
Police esakal
जळगाव

जळगाव पोलिस नाशिक ‘रेंज’मध्ये तपासात अव्वल; 23 महिन्यांत 16 खुनांचा तपास

सकाळ वृत्तसेवा

''जिल्‍हा पोलिस दलाच्या इतिहासात सेवेच्या अवघ्या २३ महिन्यांच्या कारकिर्दीत १६ क्लिष्ट (अनडिटेक्टेड) खुनाच्या घटनांचा तपास, १ कोटीची ब्राऊन शुगर १ कोटीचा गांजा, दरोडे, घरफोड्यांसह ३५ पोलिस ठाण्यांच्या तपासाची धुरा यशस्वीरीत्या पार पाडत स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक रेंजमध्ये तपासात अव्वलस्थान पटकावले आहे. नव्या दमाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे पदविधर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी गुन्ह्येशाखेला अत्याधुनिकतेचा साज चढवून सहकाऱ्यांना अत्याधुनिक तपासाची पद्धत अवगत करुन देत विखुरलेल्या गुन्हे शाखेला एकसुत्रात आणले.'' - रईस शेख, जळगाव.


कोरोना महामारीच्या कालखंडात सर्वत्र नैराश्याचे वातावरण असताना जिल्‍हा पोलिस दलाची धुरा डॉ. प्रवीण मुंढे यांनी (सप्टेंबर २०२०) रोजी हाती घेतली. पाठोपाठ सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ निरीक्षकपदी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त अभियंता निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पदभार घेतला. सलग २३ महिन्यांत ‘अनडिटेक्टेड’ या हेडखाली मोडणारे १६ क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणण्याचा चमत्कार गुन्हे शाखेच्या एकसंघ टिमने करुन दाखवला आहे.


...आवाका संपतो तेथून सुरवात

एरवी अट्टल गुन्हेगार सर्वांच्याच स्मरणात राहतो, म्हणून पोलिसही गुन्ह्याच्या पद्धतीने त्याचीच गंचाडी धरतात. मात्र, कुठलेही रेकॉर्ड नसताना गंभीर गुन्हे करुन अलिप्त राहणारे मोठे गुन्हे पचवून उजळ माथ्याने समाजात वावरतात. यावल येथील मराबाई सखाराम कोळी (वय-७०) या वृद्धेचा गळा दाबून अंगावरील दागिने चोरुन नेण्यात आले होते. उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू झाला. घटनास्थळावर संशयिताच्या चपलेच्या शिक्क्यावरुन गुन्हा उघडकीस आणुन मुकूंदा ऊर्फ बाळू बाबुलाल लोहार (वय-३०) याला अटक केली.

या भामट्याने मराबाईच्या खुनाप्रमाणेच द्वारकाबाई चैत्राम सुरवाडे (वय ७०) चौधरी वाड्यातील रुख्माबाई कडू पाटील (वय ७०) अशा तीन वृद्धांचा वर्षभरात खून करुन त्यांच्या अंगावरील दागिने लुटल्याची कबुली गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दिली. जामनेर येथील कांग नदीपुलावर शुभम नंदू माळी (वय-२३) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. जामनेर पोलिसांत दाखल अपघाती मृत्यूच्या गुन्ह्यात संशयिताने ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेप्रमाणे खून करून अपघाताचा देखावा करण्यात आल्याचे उघडकीस आणून संशयित पवन अशोक माळी (रा. बोदवड) याला अटक करण्यात आली.


गुन्हे शाखेचे अत्याधुनिकीकरण

१५० ते २०० कर्मचाऱ्यांचा डोलारा पोसणाऱ्या गुन्हे शाखेत बोटावर मोजण्याइतकेच कामाचे, तर पोलिस खातेच स्वत:च्या मर्जीप्रमाणे चालवायला बघणाऱ्या जेम्स बॉण्ड पोलिसांची चलती होती. डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात अभियांत्रिकी डोक्याने जरजर झालेल्या या गुन्हेशाखेचे ऑपरेशन करण्याचा निर्णय झाला. सर्वांत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षमीकरणांतर्गत अंगुली मुद्रा, इंटरसेप्शन, मोबाईल फॉरेन्सीक लॅब, संगणकीय विभागाला मजबूत करण्यात आले. तद्‌नंतर तपासाला कुणावरही अवलंबून न राहता निरीक्षक बकाले यांनीच तपासाची धुरा खांद्यावर घेतली.



''एरवी ज्येष्ठ निवृत्तीला आलेले निरीक्षक गुन्हे शाखेची निवड असायची. मात्र, एसपी साहेबांनी विश्वास ठेवून जबाबदारी दिली. अभियांत्रिकी शिक्षणाच्या दृष्टीकेानातून तांत्रिक समृद्धता आणि नंतर क्षमतेप्रमाणे सहकाऱ्यांच्या साथीने जळगाव जिल्‍हा नाशिक रेंजमध्ये अव्वल आणण्यात यश आले..'' - किरणकुमार बकाले, वरिष्ठ निरीक्षक स्थानिक गुन्हेशाखा

अशा गुन्ह्यांचा उलगडा...
४ नोव्हेंबर २०२० : महापौरपुत्र राकेश सपकाळे खून प्रकरण
८ डिसेंबर २० : एरंडोल येथील किशोर रमेश पाटील खून प्रकरण
२९ डिसेंबर २० : दीपक सपकाळे (सुनोदा, यावल) खून करुन रेल्वेरुळावर फेकल्याचा गुन्हा
०१ फेब्रुवारी २१ : वरणगाव येथील चांगो रामदास झोपे (६१) या वृद्धाची लूट करुन खून
२२ एप्रिल २१ : आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खुनाचा उलगडा
२२ मे २१ : योगिता मुकेश सोनार खून प्रकरणात संशयितास अटक
१३ ऑक्टेाबर २१ : राहुल पंढरीनाथ पवार (२४, रा.नेरी) खून प्रकरण
२७ जानेवारी २२ : उस्मानिया पार्क अब्दुल गफ्फार खून प्रकरण
९ एप्रिल २२ : दिनेश भिकन पाटील यांचा दगडाने ठेचून खून
२५ एप्रिल २२ : अनिकेत गायकवाड रेल्वे मालधक्का खून

ना उघड गुन्ह्यांचा उलगडा

जबरी चोरी : ३०
मंगळपोत लूट : ३३
घरफोडी : ४६
चोरी २१५
मोटारसायकल चोरी : १५९
नकली चलनी नोटा : १(जामनेर)
गावठी पिस्तूल : २८ गुन्हे
गुटखा : ७ गुन्ह्यात साडेतीन कोटींचा माल जप्त
बायोडिझेल : ५ अवैध पंपासह गुन्हे दाखल
स्थानबद्धता : ३ अट्टल गुन्हेगारांची रवानगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT