Police Transfer esakal
जळगाव

Jalgaon Police Transfer: तालुक्यातील अनेक ठाण्यात नवे कारभारी! पोलिस अधीक्षकांनी फिरविली भाकरी

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची जिल्हा अंतर्गत बदलीचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी आदेश काढले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Police Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची जिल्हा अंतर्गत बदलीचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी आदेश काढले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Jalgaon Police Transfer) झाल्या. जिल्ह्यातून अनेक अधिकारी बाहेर गेले तर बाहेरून आलेल्या पाच पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांना पदस्थापना देण्यात आली. दोन निरीक्षकांच्या जिल्हार्तंगत बदल्या केल्या आहेत. (Jalgaon Police Transfer marathi news)

शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल यांना रावेर पोलिस ठाणे, यावल ठाण्याचे राकेश मानगावकर यांना जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती दिली आहे. अमरावती ग्रामीण येथून आलेले प्रदीप ठाकूर यांना यावल, नाशिक ग्रामीण येथून आलेले राजेंद्र कुटे यांना रामानंद नगर पोलिस ठाणे, अशोक पवार यांना पाचोरा, पांडुरंग पवार यांना भडगाव, मुंबई लोहमार्ग येथून आलेले दत्तात्रय निकम हे सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी पदासह आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर येथून आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत खंडारे यांना चोपडा शहर, महेश येसेकर यांना पारोळा पोलिस ठाण्यात पदस्थापना देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण येथून आलेले पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना भुसावळ शहर पोलिस ठाणे, बबन पाटोळे यांना फैजपूर, चंद्रकांत दवंगे यांना जामनेर, संजय विधाते यांना पहुर, धुळे येथून आलेले कैलास दामोदर यांना रामानंद नगर पोलिस ठाणे, अहमदनगर येथून आलेले भरत दाते यांना पहूर, नंदुरबार येथून आलेल्या प्रिया वसावे यांना रावेर पोलिस ठाणे येथे पदस्थापना देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT