Former Bhusawal MLA Santosh Choudhary meeting Congress state president Nana Patole at his residence in Worli. esakal
जळगाव

Jalgaon Political: माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर! नाना पटोले यांची मुंबईत घेतली भेट; भुसावळला शरद पवार गटाला धक्का

Political News : गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांनी दोन वेळा या संदर्भात चर्चा केली आहे. शरद पवार गटाला हा धक्का मानला जातो.

श्रीकांत जोशी

भुसावळ : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांनी दोन वेळा या संदर्भात चर्चा केली आहे. शरद पवार गटाला हा धक्का मानला जातो. (Former MLA Santosh Chaudhary on way to Congress)

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बऱ्याच राजकीय उलथापालथी घडतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. अगदी युती व आघाडीतही बिघाडी होऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी होय. चौधरी हे शरद पवार गटातील आहे.

अगदी पक्ष फुटला तरी त्यांनी पवार गटातच राहणे पसंत केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पक्ष नेतृत्वाची चर्चा देखील झाली. कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत पुरेपूर वातावरण निर्मिती केली. मात्र, पक्षाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांचे बंड क्षमले व त्यांनी श्रीराम पाटील यांचा प्रचार केला. निवडणुकीनंतर चौधरी राजकीय चर्चेपासून दूर होते. आठ दिवसांपासून ते मुंबईत आहेत.

तीन दिवसांपूर्वी त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वरळी येथील निवासस्थानी भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. आज सकाळी कॉंग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथील कार्यालयात भेट घेऊन विस्तृत चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. सायंकाळी चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. (latest marathi news)

‘राष्ट्रवादी’ सोडणार हे निश्चित : चौधरी

मी कोणत्या पक्षात जाणार यावर अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही. विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) हे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार संतोष चौधरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ते उपरोधिकपणे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने मला खूप सांभाळले व सहकार्य केले.

नंतर ते म्हणाले १५ वर्षांनंतर लोकसभा निवडणूक लढविण्याची आलेली माझी संधी नाकारण्यात आली व एक जागा गमवावी लागली. आगामी काळात पक्षाकडून काही मिळेल, असे वाटत नाही. आता अपेक्षाही नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझे प्रत्येक पक्षात मित्र आहेत. त्यामुळे कॉंग्रेसशी चर्चा केली. शिवसेनेशी (उद्धव ठाकरे गट) यांच्याशी देखील चर्चा करेल. नंतर भुसावळला कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेईल, असे चौधरी म्हणाले.

कॉंग्रेसला मिळेल बळ

भुसावळ तालुका एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण नंतर तो प्रभाव कमी होत गेला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांचे प्राबल्य वाढत गेल्याने कॉंग्रेसची ताकद कमी झाली. चौधरी यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कॉंग्रेसला निश्चितच बळ मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT