congress party esakal
जळगाव

Jalgaon Political: पक्ष देणगी देणाऱ्यांचीच उमेदवारीसाठी शिफारस : प्रदीप पवार; काँग्रेसची जिल्ह्यातील 11 मतदारसंघांत तयारी

Political News : जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, की विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आम्ही जिल्ह्यातील सर्व अकरा मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Political : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जिल्ह्यातील सर्व अकरा मतदारसंघांत उमेदवारीची तयारी केली आहे. त्यामुळे जे उमेदवार पक्षाला देणगी देतील, त्यांच्याच उमेदवारीची शिफारस केली जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सोमवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली. पक्षाचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, आशुतोष पवार आदी उपस्थित होते. (Jalgaon Political Pradeep Pawar Congress preparations in 11 constituencies of district)

जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, की विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आम्ही जिल्ह्यातील सर्व अकरा मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विधानसभानिहाय निरीक्षकही नेमले आहेत. सात विधानसभा निरीक्षकांनी आमच्याकडे मतदारसंघाची चाचपणी करून अहवाल दिले आहेत.

मुक्ताईनगर, जामनेर, रावेर आणि चोपडा मतदारसंघाचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. विधानसभेच्या उमेदवारीसाठी खुल्या प्रवर्गातून इच्छुक उमेदवाराला २० हजार रुपये आणि राखीव गटातून किंवा महिला इच्छुक उमेदवाराला दहा हजार रुपये पक्षाला देणगी पावती म्हणून द्यावी लागणार आहे. जे उमेदवार देणगी देतील, त्यांचीच उमेदवारीसाठी शिफारस केली जाणार आहे. (latest marathi news)

भाजपला गांधींची भीती वाटते

काही दिवसांपूर्वी जळगाव भाजपने काँग्रेस भवनासमोर पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलन करणाऱ्या भाजपकडून राहुल गांधींनी केलेल्या हिंदूंच्या वक्तव्याची मोडतोड करून संभ्रम पसरविला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाजप कधीही रस्त्यावर उतरताना दिसली नाही. त्याउलट खोटे मेसेज पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असून, भाजपचा निषेध असल्याचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे लवकरच आंदोलन

जिल्ह्यातील केळी पीकविमा, ज्वारी खरेदी, कापूस उत्पादकांचे प्रश्न, विजेची समस्या या सर्व मुद्यांना अनुसरून जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडी लवकरच संयुक्त आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विसर्जन मिरवणुकीत ढोलवादन

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT