Gulabrao Patil & Girish Mahajan esakal
जळगाव

Gulabrao Patil to Girish Mahajan: गिरीशभाऊ तुम्ही दिल्लीला जा...आमची लाइन क्लीअर होईल : गुलाबराव पाटील

Jalgaon Political News : चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय ‘एमएच ५२’ सुरू करण्यात आले आहे, गुरुवारी त्याचे उदघाटन आयोजित करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गिरीशभाऊ, अमित शहा जळगावला आले होते, तुम्हाला दिल्लीला बोलावले आहे, अस समजंल, तुम्ही दिल्लीला जा, आमची लाइन क्लीअर होईल, असे हास्यविनोदात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, की आपलं लव्ह मॅरेज आहे म्हणायचं आणि दुसरीकडे माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचं सांगून, मला दिल्लीला पाठवायचे म्हणजे इकडून पण गेले आणि तिकडून पण गेले... माझा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करायचा! मला आता सावध राहावे लागेल बुवा! ही जुगलंबंदी होती, चाळीसगाव येथे गुरुवारी (ता. ७) झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाची... (jalgaon politics Gulabrao Patil comedy statement Girish Mahajanmarathi news)

चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय ‘एमएच ५२’ सुरू करण्यात आले आहे, गुरुवारी त्याचे उदघाटन आयोजित करण्यात आले होते. चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने कार्यालय मंजूर झाले आहे. या शुभारंभाच्या कार्यक्रमात महायुतीचे मंत्री व नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यातील चर्चेचा हाच धागा पकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील विनोदाने म्हणाले, की गिरीशभाऊ पुढचे आमदार आहेत की खासदार आहेत, याचे मला काही माहीत नाही, अमित शहा जळगावात आले होते, ते म्हणाले, की आप दिल्ली चलो, आपके जैसा नेता हमको लगता है!’ गिरीशभाऊ दिल्लीला गेले म्हणजे आमची लाइन क्लिअर होऊन जाईन, मी त्यांना दोन दिवसांपासून रोज चिडवतोय फोन केला, मी म्हणतोय काय, खासदार साहेब बर चाललंय... गिरीशभाऊ तुम्ही मुंबईत असतात. (Latest Marathi News)

मतदारसंघात लग्न तसेच इतर समारंभात तुमच्या पत्नी साधनाताईच गाठीभेटी घेऊन संपर्क ठेवत असतात. त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवायचा आणि तुम्ही आमदार व्हायचं हे चांगल नाही. आता तुम्ही साधनावहिनींनाच आमदारकीचे तिकीट द्या, नाहीतरी २०२९ मध्ये महिलांनाच उभे करावे लागणार आहे.

ग्रामविकामंत्री गिरीश महाजन यांनीही गुलाबराव पाटील यांना मिश्‍कील उत्तर देत टोला लगावला. ते म्हणाले, की गुलाबराव, आम्हाला मित्र म्हणतात, दुसरीकडे आम्हाला दिल्लीला पाठवतात. जाऊ द्या दिल्लीला यांना म्हणजे आम्ही इकडे मोकळे, त्याच्याही वरचढ त्यांनी सांगितले, की आमदारकी ही साधनावहिनींनाच द्या म्हणचे इकडूनही गेले आणि तिकडूनही गेले, ही कसली मैत्री आहे.

कसलं लव्ह मॅरेज आहे, एकीकडे लव्ह मॅरेज आहे, अस तुम्हीच म्हणता आणि एकीकडे आमच्या जिवावर टपून बसता, यांचा पत्ताच कट करा, मला आता तुमच्या सगळ्यापासून सावधच राहावे लागेल बुवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT