crime esakal
जळगाव

Jalgaon News : लग्नाचे आमिष दाखवून जळगावात महिलेवर अत्याचार; पीडित गर्भवती

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या अत्याचारातून पीडित गर्भवती राहिली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या अत्याचारातून पीडित गर्भवती राहिली. लग्नही केले नाही आणि अत्याचार करून सोडून दिल्याची तक्रार पीडितेने दिल्यावरून शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. (Pregnant victim of violence against women luring her to marry )

त्यांचे कौटुंबिक कारणावरून पतीसोबत नेहमी भांडण होत असल्याचा गैरफायदा घेऊन संशयित तुषार राजेंद्र अहिरे (वय २८) याने विवाहितेला सांगितले, की पतीला घटस्फोट देऊन मी तुझ्याशी लग्न करेल, असे सांगून तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अत्यावर केला. हा प्रकार मे २०१८ पासून सुरू होता. त्यानंतर या अत्याचारातून विवाहिता गर्भवती झाली.

त्यानंतर त्याने विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारानंतर विवाहितेने शनिवारी सायंकाळी सहाला शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित तुषार अहिरे याच्याविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिपेठ पोलिसांनी तुषार अहिरे याला अटक केली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT