Lemon Price Hike  esakal
जळगाव

Jalgaon Lemon Price Hike : लिंबांचे भाव वाढले, 10 रुपयाला तीनच!

Jalgaon News : गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा ४२ अंशावर ला पोहोचल्याने कडक उन्हापासून बचाव व्हावा म्हणून लिंबू सरबत, उसाचा रस पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणपुर : गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा ४२ अंशावर ला पोहोचल्याने कडक उन्हापासून बचाव व्हावा म्हणून लिंबू सरबत, उसाचा रस पिणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात लिंबूला मागणी ही वाढली आहे . मागणीच्या प्रमाणात बाजारात लिंबाची आवक नसल्याने दर वाढले आहेत. गेल्या पंधरवड्यात लिंबूला कमी मागणी होती. (Jalgaon price of lemon has increased only three for 10 rupees)

त्यामुळे दरही कमी होते मात्र सध्या लिंबूच्या बागा काही भागात वादळ वारा व गारपिटीने झोडपल्या गेल्याने लिंबूची आवक बाजारात कमी झाली . जिल्ह्यात जामनेर व चाळीसगाव व विशेषतः गुढे परिसरात लिंबूच्या बागा आहेत. तर इतर तालुक्यात काही भागात लिंबूच्या बाग दिसून येतात.

चोपडा तालुक्यातही अकुलखेडे, चौगाव, गणपुर सह काही शिवारात लिंबू च्या बागा आहेत. सद्यस्थितीत बाजार समिती व भाजीपाला बाजारात होणाऱ्या लिलावात लिंबूची गोणी पंधराशे ते दोन हजार रुपयांना विक्री होत असून आठवडे बाजार व भाजीपाला बाजारात दहा रुपयाला पाच-सहा मिळणारे लिंबू आता तीनवर आले आहेत.

लिंबू चा वापर उन्हाळामुळे लिंबू शरबत,लिंबूपाणी व उसाच्या रसात होत असल्याने शिवाय जेवणातही लिंबूचा वापर वाढल्याने बाजारातील मागणी वाढली आहे .मात्र सद्यस्थितीत उपलब्ध बागांमध्ये पाहिजे तेवढा लिंबू नसल्याने बाजारात लिंबूची आवक मंदावली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT