Consumers while buying vegetables in the market.
Consumers while buying vegetables in the market. esakal
जळगाव

Jalgaon Lemon Rates Hike : लिंबाच्या दरात वाढ; भाजीपाला स्थिर; गारपीट, ‘अवकाळी’मुळे आवक मंदावली

संजय पाटील

Jalgaon Lemon Rates Hike : उन्हाळा सुरू झाला की, लिंबाचे भाव हे गगनाल भिडतात. उन्हाळ्यातील सरबतामुळे गारवा देणाऱ्या या लिंबांनी आतापासूनच सामान्य नागरिकांना रडवायला सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लिंबाचे भाव हे वाढले आहेत. जानेवारीत ८० आणि १०० रुपये किलोने मिळणारा लिंबू आता १२० ते १३० प्रति किलोने मिळत आहे. दैनंदिन वापरात येणारा भाजीपाल्याचा बाजारभाव स्थिर असला तरी गवार व हिरव्या मिरचीने गृहिणींचा हिरमोड केल्याचे चित्र दिसून येते. (Jalgaon prices of lemons have increased)

तर उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबाच्या आंबटपणाने महागाईची आवरण घातल्याचे दिसून येत असून, एक लिंबू पाच रुपयाला बाजारात विकला जात आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गृहिणींना लिंबू सरबतऐवजी चहा किंवा ताक यजमानांना द्यावा लागत आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या भाजीपाल्याचे दर गृहिणींना परवडणारे आहेत.

मात्र गवारने ८० रुपये किलोचा पल्ला गाठला असून, हिरव्या मिरचीचा तिखटपणा वाढला असून, देखील ८० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये हिरव्या मिरचीऐवजी कांदा अथवा चटणीचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, आज भाजी बाजारातील दर वांगे २० रुपये, मेथी ४० रुपये, टमाटे २० रुपये, बटाटे २५ रुपये असे भाव होते.

दरम्यान, सध्याच्या वातावरणामुळे भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार होत असल्याचे भाजीपाला विक्रेते गोपाल महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. दरम्यान, २६ फेब्रुवारीला गारपीट व वादळी पावसामुळे लिंबासह इतर भाजीपालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आवकचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा परिणाम विक्रीवर झाला असल्याचे दिसून येते. (latest marathi news)

तालुक्यातील बोरी परिसरात लिंबूच्या बागा आहेत. तसेच इतर भाजीपाल्यांची निर्यात देखील शहरालगच्या आजूबाजूच्या गावातून भाजीपाला विक्रेते करीत असल्यामुळे शहरवासीयांना पाहिजे तो व वेळेवर दैनंदिन भाजीपाला घरबसल्या मिळत असल्यामुळे गृहिणींनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

लिंबू बागांना अवकाळीचा फटका

लिंबूची सर्वांत जास्त मागणी ही उन्हाळ्यात असते. याच कारणामुळे बाजारात गेल्या आठवड्यापासून लिंबाचा भाव हा वाढला आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही लिंबाच्या किमती या वाढत आहेत. दोन महिन्यांपूर्वी बाजारात पाच रुपयांना पाच लिंबू मिळत होते. मात्र आता पाच रुपयांत एकच लिंबू मिळत आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे लिंबाच्या बागांना मोठा फटका बसला असून, परिणामी आवक कमी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Updates : 'त्या' अल्पवयीन आरोपीचा अपघातापूर्वीचा पबमधला व्हिडीओ आला समोर; पब चालकासह इतरांवर गुन्हे दाखल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Pune Accident News: पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी पोलिसाचं निलंबन? गृहमंत्र्याचे कठोर कारवाईचे आदेश; हे आहे कारण

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT