Navratri 2024  esakal
जळगाव

Navratri 2024 : दांडियासाठी दहाची डेडलाइन! अष्टमीला बारापर्यंत परवानगी; पावणेतीनशे मंडळांमध्ये रासदांडिया रंगणार

Navratri 2024 : घटस्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर दुर्गोत्सव मंडळांची तयारी पूर्णत्वास आली असून, पोलिस दलानेही तयारी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : घटस्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर दुर्गोत्सव मंडळांची तयारी पूर्णत्वास आली असून, पोलिस दलानेही तयारी केली आहे. २७५ दुर्गोत्सव मंडळांकडून दुर्गामातेची विधिवत पूजा करुन स्थापना करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे, नवरात्रोत्सवात दांडियासाठी रात्री दहापर्यंत परवानगी राहणार असून, अष्टमीला रात्री बारापर्यंत दांडिया खेळता येणार आहे. गणेशोत्सवाच्या स्मृती अजून ताज्याच असताना दुर्गोत्सवाला सुरवात होत आहे. (Raas Dandiya will be performed in fifty three hundred mandal in city )

दुर्गोत्सवासाठी मंडळांसह जिल्‍हा पेालिस दलानेही जय्यत तयारी केली आहे. दुर्गोत्सव हर्षोल्लासात साजरा व्हावा, यासाठी पोलिस दलाने नियोजन केले आहे. जळगावात २७५ मंडळांचे अर्ज आले होते, या सर्व मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. ३) चार ते पाच आगमन मिरवणूक राहणार असून, त्यादृष्टीने बंदोबस्त राहणार आहे. शहरात ज्या-ज्या भागात दुर्गा उत्सव मंडळ आहे, त्या ठिकाणी त्या-त्या पोलिस ठाण्यांचा बंदोबस्त राहणार आहे. या शिवाय शहरात पोलिसांच्या गस्तीपथकांना नियुक्त करण्यात आले आहे असून, काही फिक्स पॉइंट उभारून तेथे तपासणी केली जाणार आहे. (latest marathi news)

सीसाीटीव्ही कार्यान्वित

मंडळाच्या ठिकाणी वादविवाद, छेडखानीचे प्रकार होऊनये यासाठी दांडियाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तसेच मोकळा उजेड राहावा, यासाठी प्रकाशयंत्रणा करण्याच्याही सूचना आहे. त्यामुळे कोणी काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तरी तो ‘सीसीटीव्ही’त कैद होऊन पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT