Electricity generation by setting up solar panels at some railway stations. esakal
जळगाव

Jalgaon News : सौर ऊर्जेने उजळणार रेल्वेस्थानके; जळगाव, भुसावळसह 22 स्थानकांचा समावेश

Jalgaon : भारतीय रेल्वे सेवेत सर्वच रेल्वेस्थानके ही सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, भुसावळ विभागातील २२ रेल्वेस्थानकांवर सौर ऊर्जा सिस्टिमचा उपयोग करून विजेचा वापर करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय रेल्वे सेवेत सर्वच रेल्वेस्थानके ही सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, भुसावळ विभागातील २२ रेल्वेस्थानकांवर सौर ऊर्जा सिस्टिमचा उपयोग करून विजेचा वापर करणार आहे. यात १.२ मेगावॅट सोलर सिस्टम लावून झाली आहे. उर्वरित कामे सुरू आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाचे अंदाजे १ कोटी ४४ लाख रूपयांचे वीजबिलापोटी एक वर्षाची बचत होणार आहे. (Railway stations will be lit by solar energy of Bhusawal dhule )

भुसावळ परीक्षेत्रातील रेल्वेस्थानकांसह वर्कशॉप, पीओएच, एमओएच शेड येथेही या विजेचा उपयोग केला जाणार आहे. भारतीय रेल्वेत आधुनिकतेचा वापर केला जात आहे, याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सौर ऊर्जेचा उपयोग केला जात असल्यामुळे विजेची बचत होऊन सोलरच्या माध्यमातून कार्यालयांमध्ये वीज उपलब्ध केली जाणार आहे.

याच विजेवर रेल्वेस्थानकातील लाईट, विजेची उपकरणे, संगणक, तिकीट प्रणाली यांच्यासाठी याच विजेचा उपयोग केला जात आहे. यात डीआरएम कार्यालय, झोनल ट्रेनिंग सेंटर, मनमाड येथील रेल्वेचे वर्कशॉप येथे सोलरद्वारे वीज प्रवाह घेतला जात आहे. यात दोन प्रकारचे सोलर सिस्टम निर्मित आहे. (latest marathi news)

सौर उर्जेत विभाग अव्वल

मध्य रेल्वेत भुसावळ विभागाचा सोलर सौर उर्जा प्रकल्प लावण्यात प्रथम क्रमांक आहे. तर भारतीय रेल्वेत भुसावळ विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार विभागात ग्रीन उर्जा निर्माण केली जात आहे. पुढील वर्षात १.४ मेगावॅटचे ग्रीन उर्जा सोलर सिस्टिम लावण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

..या स्थानकांवर सोलर

भुसावळ विभागात सौर उर्जा सिस्टिमच्या वापरात जळगाव, भुसावळ, धुळे, हिरापूर, पाचोरा, सावदा, रावेर, निंभोरा, शेगाव, अमरावती, बऱ्हाणपूर, मांडवा, अकोला, बडनेरा, मूर्तिजापूर, गायगाव, खंडवा, डोंगरगाव, बगमार, चांदणी, नेपानगर, देवळाली या स्थानकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

८४ व्या वर्षीही आशा पारेख घेतात फिटनेसची काळजी! रात्रीच्या जेवणात असतं खास कॉम्बिनेशन

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

SCROLL FOR NEXT