Damage to Bhagwati Kast's farm along Vadgaon road esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage Crop : मुसळधारेमुळे कापूस पीकाचे नुकसान

Rain Damage Crop : मुसळधार पावसामुळे पाण्याचा लोडा व ग्राम पंचायती तील तयार केलेल्या गटार फुटल्याने शेतातील कापूस व ठिबक नळ्या वाहून गेल्या.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage Crop : अडावद (ता.चोपडा) येथील वडगांव रस्त्यालगत मुसळधार पावसामुळे पाण्याचा लोडा व ग्राम पंचायती तील तयार केलेल्या गटार फुटल्याने शेतातील कापूस व ठिबक नळ्या वाहून गेल्या. ट्युबेलचे नुकसान झाले. अडावद येथील भगवती कासट गट ४८५ महिलाचे वडगाव रोडा लगत शेत आहे त्यात त्यांनी पाच एकर मध्ये कापूस हे ठिबक सिंचनच्या साहायाने लागवड केली होती. (Rain Damage cotton crop due to heavy rain )

दोन तीन दिवसांपूर्वी रात्री पाऊस व अडावद ग्राम पंचायतीच्या गटारीच्या सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे संपूर्ण पाणी शेतात वाहून आल्यामुळे ते शेतात शिरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे भगवती कासट यांच्या शेतातील कापूस व ठिबक नळ्या पूर्ण पणे वाहुन गेल्या. ट्युबवेलला छिद्र पडल्यामुळे केसिंग उघडी झाल्यामुळे ट्युबवेल सुद्धा जमिनीत आठ ते दहा खोल फुट गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. (latest marathi news)

अडावद गावाचे संपूर्ण गटारीचेसांड पाणी या रस्त्यावरून जाते त्याची विल्हेवाट ग्रामपंचायतीने लावली पाहिजे मात्र ग्रामपंचायतीकडून गटारीचे काम होत नाही. साफसफाई होत नसल्याने त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अडावद परिसरातील अनेक शेतकऱ्याचे मका कापूस केळी व नवीन टाकलेले कांद्याचे बियाने सुद्धा वाहून गेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाच्या नळया वाहुन गेल्या. यात पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT