Addressing the rally, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Girish Mahajan, Gulabrao Patil, Smita Wagh, Raksha Khadse, Suresh Bhole, etc. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : विरोधकांच्या तोंडी विकासाची नव्हे, शिव्यांची भाषा : फडणवीस

Jalgaon News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास, प्रगतीचे शिखरे गाठतोय. समक्ष, समृद्ध आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास, प्रगतीचे शिखरे गाठतोय. समक्ष, समृद्ध आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. असे असताना विरोधकांकडे विकास, प्रगतीचे मुद्दे नाहीत. त्यांच्या तोंडी शिव्यांची भाषा आहे. त्यामुळे ही लढाई देशासाठी, मोदींच्या नेतृत्वासाठी असून, आपल्याला मजबूर नव्हे. (Jalgaon Raksha Khadse and Smita Wagh filed their nomination)

मजबूत पंतप्रधानांची निवड करायची आहे, असे आवाहन भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप-महायुतीच्या रावेर मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे व जळगावातील उमेदवार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २५) भव्य शक्तिप्रदर्शनासह दाखल करण्यात आला.

त्यानंतर झालेल्या सभेस संबोधित करताना श्री. फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी दोघा उमेवारांसह खुल्या वाहनावर निघालेल्या रॅलीत स्वत: फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. ही रॅली शिवतीर्थापासून निघून स्वातंत्र्य चौकात तिचा संबोधन सभेत समारोप झाला.

फडणवीसांचे आवाहन

कडाक्याच्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या कायर्कर्ता, नागरिकांची आभार मानत फडणवीस म्हणाले, की मोदींच्या इंजिनात सामान्य लोकांना स्थान असून, देशाच्या विकासासाठी मोदींच्या नेतृत्वातील इंजिनाला जळगाव व रावेर मतदारसंघांतील विजयाचे डबे लावा. गेल्या दहा वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांमुळे २५ कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे.

जाती-धर्माची नव्हे, देशाची लढाई : महाजन

संजय राऊत काल याठिकाणी बरळून गेले. त्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो, पण आमची ती संस्कृती नाही. आमच्या उमेदवार भगिनींबद्दल आता अप्रचार केला जातोय. जाती-पातीच्या खालच्या पातळीपर्यंत राजकारण केले जातेय. ही निवडणूक जाती-धर्माची, समाजाची नसून देश, राष्ट्राच्या सुरक्षा, प्रगतीची आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. (Latest Marathi News)

मोदींवर टीका करण्याची राऊतांची लायकी नाही : गुलाबराव

याच मैदानावर संजय राऊतांनी खालच्या पातळीवर टीका केली. ही निवडणूक देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आहे. देशाची सुरक्षा, विकास, संविधानाची सुरक्षा ही मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे स्मिता वाघ, रक्षा खडसे या केवळ उमेदवार आहेत. आपले मत त्यांच्या माध्यमातून थेट मोदींनाच मिळणार आहे. कुणीही शांत बसू नका. बूथप्रमुखांची स्पर्धा लावा. जो जास्त मतदान काढून आणेल, त्याला बक्षीस देण्याची तरतूद करा, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

टपरीवर बसून त्यांना चुना लावा : अनिल पाटील

संत मुक्ताबाई, बहिणाबाई चौधरी, पूज्य सखाराम महाराजांचा हा जिल्हा आहे. अशा ठिकाणी येऊन संजय राऊत यांनी घाणेरड्या भाषेत टीका केली. गुलाबराव पाटलांना टपरीवर बसवा, असे बोलले. आता गुलाबरावांनी त्यांना असा चुना लावावा की, ते परत जळगावला येणारच नाहीत, असे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती

सभेस आमदार संजय सावकारे, सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, चिमणराव पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ए. टी. पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, मनसेचे ॲड. जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार चैनसुख संचेती, दिलीप वाघ, शिरीष चौधरी, अनिल अडकमोल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT