श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात sakal
जळगाव

जळगाव : राम जन्मला गं सखे राम जन्मला

‘सियावर रामचंद्र की जय’च्या जयघोषात श्रीराम जन्मोत्सव

राजेश नागरे

जळगाव : राम जन्मला गं सखे राम जन्मला... सियावर रामचंद्र की जय... जय श्रीराम... जय श्रीराम. अशा जयघोषात रविवारी (ता. १०) श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरात साजरा करण्यात आला. तब्बल दोन वर्षांनंतर आज प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र कोरोना नियंत्रणात असल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी ठिकठिकाणी शहरासह जिल्ह्यात श्रीराम नवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चिमुकले श्रीराम मंदिर

नवे एसटी बस स्थानकासमोरील चिमुकले श्रीराम मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. पहाटे साडेपाचला काकडा आरती झाली. सकाळी १० ते दुपारी १२.३० दरम्यान हभप दादा महाराज जोशी यांचे किर्तन झाले. दुपारी बाराला प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सीमा भोळे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री डॉ. पवार, आमदार महाजन यांनी प्रभु श्रीरामांच्या झोपाळ्याला झुला दिला. त्यानंतर श्रीराम महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाविकांनी श्रीराम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

जुने जळगावातील श्रीराम मंदिर

जुने जळगावातील ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे प्रभु श्रीराम नवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे काकडा भजन, आरती, प्रभु श्रीरामचंद्रांच्या मूर्तीस पंचांमृत अभिषेक करण्यात आला. पहाटे तुलसीअर्चना, सकाळी सातला प्रभु श्रीरामचंद्रांची मंगल आरती करण्यात आली. यजुर्वेद सेवा झाली. दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होवून नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी रामभक्त महिला मंडळांचे भजन सेवा, हरिपाठ, रामरक्षास्त्रोत पठण करण्यात आले. सायंकाळी त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करण्यात आला. सायंकाळी सातला प्रभु श्रीरामचंद्रांची धुपारती, रात्री संस्कार भारतीतर्फे आयोजित गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच श्रीराम मंदिरात मोठी गर्दी केली होती. भाविकांना या ठिकाणी सरबतचेही वाटप करण्यात आले. सोमवारी (ता. ११) श्री महाराजांचे परंपरेचे काल्याचे भजन होऊन श्रीराम नवमी महोत्सवाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT