MLA Chimanrao Patil giving a statement to Health Minister Tanaji Sawant esakal
जळगाव

Jalgaon: प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या; आमदार चिमणरावांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ८०० कंत्राटी वैद्यकीय अधिकारी २०१९ पासून कार्यरत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑगस्ट २०१९ पासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना कायमस्वरूपी शासन सेवेत समाविष्ट करुन घेण्याची मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत केली. यावेळी आमदार पाटील यांनी मंत्री सावंत यांची भेट घेत त्यांना निवेदन देत चर्चा केली. (Jalgaon Recruit Primary Health Center Contract Medical Officers into Govt)

राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ८०० कंत्राटी वैद्यकीय अधिकारी २०१९ पासून कार्यरत आहेत. नियुक्त वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी राहून कोरोना काळात ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली. आजही अनेक डॉ. याठिकाणी कार्यरत आहे. २०२१ च्या मंत्रीमंडळाचा बैठकीत निर्णय घेऊन संदर्भ क्र. ४ अन्वये शासनाने कोरोना कालावधीत ८९९ वैद्यकीय अधिकारी गट अ (बीएएमएस) ची पदे स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

या जाहिरातीनुसार कोणताही शासकीय कामाचा अनुभव नसलेल्या डॉक्टरांना सरळसेवानुसार कायमस्वरूपी नियुक्ती दिली. शासन निर्णयाप्रमाणे २५ टक्के जागा बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी राखीव आहेत. ३१ मार्च २०२१ रोजीच्या जाहिरातीमध्ये २५ टक्के जागा आरक्षित न करता कोरोना काळात सेवा देणाऱ्या ८०० बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांना अन्यायकारक पद्धतीने शासनाने कार्यमुक्त केले. त्यामुळे या डॉक्टरांवर अन्याय झाला आहे. (latest marathi news)

राज्यात शासनाच्या वैद्यकीय अधिकारी बीएएमएस गट अ पदाच्या १००० जागा राखीव असताना फक्त १९६ पदे भरली गेली होती. त्यातील काही पदे निवृत्तीने रिक्त झाली आहेत. २०१९ मधील जिल्हा निवड समितीमार्फत बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्ती देण्यात आली होती. सदर कार्यरत व कार्यमुक्त केलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत त्यांचे शासन सेवेत कायम स्वरूपी गट अ पदावर समावेशन करण्यात यावे अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

SCROLL FOR NEXT