Eknath Khadse esakal
जळगाव

Jalgaon Eknath Khadse : एकनाथ खडसेंसह पत्नी, जावयास नियमित जामीन

Jalgaon Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात नियमित जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ वृत्तेसवा

Jalgaon Eknath Khadse : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी व जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात नियमित जामीन मंजूर झाला आहे. पुणे न्यायालयाने हा जामीन मंजूर केल्याने खडसे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. (Jalgaon Regular bail to wife, son-in-law with Eknath Khadse)

पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात तत्कालीन महसूलमंत्रिपद असताना खडसेंनी पदाचा दुरुपयोग करून कुटुंबीयांना फायदा होईल, असे कृत्य केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याच कारणास्तव खडसेंना फडणवीस मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या जमिनीची बाजारभावानुसार किंमत जास्त असताना ती कवडीमोल किमतीत खरेदी केल्याचा ठपका खडसेंच्या पत्नी मंदाताई व जावई गिरीश चौधरी यांच्यावर होता. (latest marathi news)

चौधरी यांना या प्रकरणी ‘इडी’ने अटक केली होती. मात्र, गेल्या वर्षीच त्यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही गुन्हा दाखल होता.

त्यासंबंधी न्या. पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यावर आज सुनावणी होऊन खडसे दांपत्यासह गिरीश चौधरींना नियमित जामीन मंजूर करण्यात आला. ॲड. अबीद मुलानी यांनी खडसे कुटुंबीयांतर्फे कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT