Jalgaon robbery case Arrest suspect Chalisgaon city police sakal
जळगाव

जळगाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला मुद्देमालासह अटक

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : शहरातील एका गॅस एजन्सीच्या कार्यालयात मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व दुचाकीसह सुमारे साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार झालेल्या संशयिताला शहर पोलिसांनी मुंबईतील विमानतळावर सापळा रचून अटक केली.

शहरातील मालेगाव रोडवरील श्री. बजाज यांच्या मालकीच्या एच. पी. गॅस कंपनीच्या कार्यालयात त्यांच्याचकडे काम करणाऱ्या भावेश मनोज माखीजा (मूळ रा. उल्हासनगर, सध्या रा. सिंधी कॉलनी, चाळीसगाव) याने मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास दुकानात घुसून मॅनेजर छाबडीया यांच्या हातावर चाकूने किरकोळ जखम करुन, त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील सुमारे ३ लाख ६५ हजारांची रोकड व छाबडीया यांच्या मालकीची मोटारसायकल असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून चोरुन नेला होता.

याप्रकरणी संशयित भावेशविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याकडून २ लाख २५ हजार रोख, त्याने चोरीच्या पैशातून खरेदी केलेले नवीन कपडे तसेच गोवा राज्यातून खरेदी केलेल्या विदेशी दारुच्या बाटल्या, इतर साहित्य व चोरुन नेलेली मोटारसायकल असा एकूण ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, संशयित माखीजाला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले व राकेश पाटील हे करीत आहेत.

असा रचला सापळा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस तसेच कर्मचारी भूषण पाटील व विजय पाटील यांना तातडीने आरोपीच्या शोधार्थ उल्हासनगरला पाठवले. तपासादरम्यान संशयित माखीजा हा गोवा येथे गेला असून तो गुरुवारी गोवा येथून विमानाने मुंबईत परत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने सहारा विमानतळावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT