Drain cleaning in the sewer directly in front of Tapri Complex from Mahatma Gandhi Multipurpose Hall in the city. esakal
जळगाव

SAKAL Impact : फैजपूर येथे नालेसफाई पूर्णत्वास! ‘सकाळ’चा पाठपुरावा

SAKAL Impact : पालिकेकडून शहरातील नालेसफाई यंदा वेळेवर सुरू करण्यात आली. जवळपास सर्वच नाल्यांची सफाई पूर्णत्वास आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : पालिकेकडून शहरातील नालेसफाई यंदा वेळेवर सुरू करण्यात आली. जवळपास सर्वच नाल्यांची सफाई पूर्णत्वास आली आहे. ‘सकाळ’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने काही वर्षांपासून न होणाऱ्या ठिकाणी नालेसफाई झाल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. येथील पालिकेतर्फे मे महिना संपल्यानंतर पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई केली जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नाले, भुयारी गटारी यांची नालेसफाईची मोहीम शहरात राबविण्यात येते. ( Drain cleaning completed at Faizpur )

गेल्या वर्षी जुलैत क्वचित ठिकाणी वरवर नालेसफाई झाली होती. ज्या ठिकाणी मोहीम राबविणे अपेक्षित होते, तेथे नालेसफाई न झाल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच भर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुलापासून ते आठवडे बाजारापर्यंतची प्रमुख मोठी गटार प्लास्टिक व गाळाने गच्च भरल्याने पाण्याचा योग्य निचरा न होता पावसाचे पाणी वर आले होते. (latest marathi news)

त्यावेळी नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गेल्या वर्षात नालेसफाईवर दोन ते अडीच लाख रुपये पालिकेने खर्च केला. तरीही योग्य पद्धतीने नालेसफाई झाली नसल्याची ओरड झाली. जनभावना तीव्र झाल्याने या वस्तुस्थितीचा ‘सकाळ’ने पाठपुरावा करीत सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्याने यंदा वेळेवर नालेसफाईला सुरवात झाली.

शहरातील त्रिवेणी मंदिराजवळून आठवडे बाजारापर्यंतच्या प्रमुख गटार, सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल व वीर सावरकर व्यापारी संकुल आणि आठवडे बाजारालगत धाडी नदी पात्र यासह शहरातील विविध भागात यंदा पालिकेने दोन जेसीबी लावून वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षित असलेले याच प्रमुख गटारीचे गाळ काढल्याने व सर्व ठिकाणी नालेसफाई करण्यात आल्याने पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT