Bujvili pothole on the road in front of the market committee entrance. esakal
जळगाव

SAKAL Impact News : पाचोरा येथे रस्त्यावरील खड्डे बुजले! पालिकेची कार्यवाही; नागरिकांमध्ये समाधान

Jalgaon News : ‘सकाळ’मध्ये २७ एप्रिलला ‘पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण’ या मथळाखाली छायाचित्र व त्रस्त नागरिकांच्या प्रतिक्रियांसह वस्तुस्थितीवर आधारित वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील भडगाव रोड भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिन्ही गेटसमोर पडलेले मोठमोठे खड्डे पालिकेने बुजविले असून, ‘सकाळ’मध्ये यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने ही कायवाही केली आहे. २९ एप्रिलला पालिकेच्या पथकाने बाजार समितीच्या तिन्ही गेटसमोरील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवून रस्ता वाहतूक योग्य केला. (jalgaon SAKAL Impact Road potholes in Pachora news)

‘सकाळ’मध्ये २७ एप्रिलला ‘पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण’ या मथळाखाली छायाचित्र व त्रस्त नागरिकांच्या प्रतिक्रियांसह वस्तुस्थितीवर आधारित वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामुळे पालिकेला जाग आली व पालिकेने खड्डे बुजून रस्ता वाहतूक योग्य करण्यासाठी लगबग सुरू केली. हा रस्ता दिवसभर वाहतुकीचा व वर्दळीचा आहे. (Latest Marathi News)

यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले नागरिक व वाहनचालकांकडून आनंद व्यक्त होत असून, रस्त्यांच्या अवस्थेचे वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. दरम्यान, पालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भातही अशाच स्वरूपाची कार्यवाही करून संभाव्य अपघात व हानी टाळावी. नागरिक व वाहनचालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT