Bribe Crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime News : खडकदेवळाच्या सरपंचास लाच स्वीकारताना अटक

Latest Crime News : लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी करण्यात आली. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात सरपंच अनिल पाटीलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : खडकदेवळा बुद्रूक (ता.पाचोरा) येथील सरपंच अनिल विश्राम पाटील यांनी तक्रारदाराकडून घरकुल योजनेच्या लाभासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली. ही कारवाई आज करण्यात आली. (Sarpanch of Khadakdevla arrested while accepting bribe)

तक्रारदार खडकदेवळा बुद्रूक गावातील रहिवासी आहेत. त्यांचे नावे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल मंजूर झाले. परंतु, ते राहत असलेली जागा त्यांचे नावे नसल्याने गाव नमुना आठ ‘अ’मध्ये ग्रामसेवकाकडून नाव लावून घेण्यासाठी सरपंच अनिल पाटील यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली.

ती लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी करण्यात आली. याबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात सरपंच अनिल पाटीलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT