A new school room built with funds coming under Zilla Parishad. esakal
जळगाव

School First Day : अमळनेर तालुक्यातील शाळांना मिळाल्या नवीन खोल्या; काही गावांत कामे सुरू

School First Day : पावसाळ्यापूर्वीच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये नवीन खोल्या, शाळांची दुरुस्ती, डागडुजी, सुशोभीकरण झाले असून, काही कामे सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

School First Day : पावसाळ्यापूर्वीच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये नवीन खोल्या, शाळांची दुरुस्ती, डागडुजी, सुशोभीकरण झाले असून, काही कामे सुरू आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप होणार आहेत. गणवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंगोणे खुर्द, आमोदे, सारबेटे, लोणपंचम, रामेश्वर, बहादरवाडी, खापरखेडा, सोनखेडीतील प्राथमिक शाळांच्या खोलींचे बांधकाम सुरू आहे. यातील काही खोल्या पूर्णत्वास आल्या आहेत. ( Schools in Amalner taluka got new room )

काही निर्माणाधिन आहेत, तर मुडी प्र., देवगाव देवळी, एकरुखी, खापरखेडा, ढेकूसीम, चिमणपुरी, दरेगाव, हेडावे, निमझरी या शाळांमध्ये प्रत्येकी तीन लाख रुपये खर्चून दुरुस्ती केली आहे. शासनाच्या बाला उपक्रमांतर्गत तालुक्यातील १९ शाळांनी शाळांच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, फर्निचर आदी साधनांवर विविध चित्रे, गणिताची सूत्रे, नकाशे, बाराखडी आदी रंगविले आहेत. तालुक्यातील १३३ जिल्हा परिषदांना शाळांना डीपीडीसींतर्गत पंखा व दिव्यांची सुविधा पुरविली आहे.

शिक्षण विभागात ३८ पदे रिक्त

अमळनेर तालुका शिक्षण विभागात चार विस्ताराधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे रिक्त आहेत. अमळनेर व अमळगाव बिट रिक्त आहे. केंद्रप्रमुख १३पैकी सहा पदे रिक्त आहेत. सावखेडा, दहिवद, गडखांब, मारवड, वावडे, जैतपीर ही रिक्त केंद्रे आहेत. पदवीधर शिक्षकांच्या भाषा विषयांच्या २०पैकी पाच पदे रिक्त आहेत. त्यात नंदगाव, कलाली, कुर्हे या गावांचा समावेश आहे. (latest marathi news)

मठगव्हाण शाळेतील पद शून्य पटसंख्येमुळे व्यपगत केले आहे. गणित-विज्ञान शिक्षकांच्या २०पैकी १२ पदे रिक्त आहेत. कुर्हे, कलाली, गलवाडे, गडखांब, जैतपीर, नगाव बुद्रुक या शाळांतील पदे रिक्त आहेत. तालुक्यातील पाच शाळांत समाजशास्त्राचे पाच शिक्षक गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करीत आहेत. समाजशास्त्र विषयाच्या तीनपैकी नंदगाव येथील एक पद रिक्त आहे. उपशिक्षकांच्या ३७९पैकी १३ पदे रिक्त आहेत.

त्यात सडावण, मांडळ बॉइज, निमझरी, चोपडाई, नीम, रणाईचे, लोंढवे, गोवर्धन, जवखेडे, टाकरखेडा, रुंधाटी, अमळगाव, सारबेटे बुद्रुक या गावांचा समावेश आहे. यापैकी नीम येथील शाळेत जिल्हास्तरावरून प्रतिनियुक्तीवर एक शिक्षक दिला आहे. चोपडाई शाळेत निलंबित शिक्षिकेला पुनर्स्थापित केले आहे. तालुक्यातील उर्दू विभागातही सारबेटे येथे एक ग्रेडेड मुख्याध्यापक व एक उपशिक्षक अशी दोन पदे रिक्त आहेत.

''पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक शाळांनी सजावट केली आहे. गुलाबपुष्प, मिठाई, रंगीबेरंगी फुगे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. तालुक्यातील २३३ मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या २७ हजार २०० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप होणार आहे. शिक्षकांच्या रिक्तपदांची माहिती विभागाकडे पाठविली आहे. जिल्हास्तरावरून यावर कार्यवाही सुरू आहे. लवकरच रिक्त जागांवर शिक्षक रुजू होतील. जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यावरही भर दिला जाईल.''-रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT