शाळा sakal
जळगाव

अमळनेर : डॉ. कलाम सेंटरसाठी चार शाळांची निवड

आता शाळांमध्ये विविध वैज्ञानिक ॲक्टिव्हिटी राबविण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी डॉ. कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटरची देशभरात सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली.

डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात यांच्यावतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट अंतर्गत देशभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील बी. बी. ठाकरे विद्यालय वावडे (ता अमळनेर), सर्वोदय हायस्कूल (किन्ही), श्री शारदा विद्यालय (दीपनगर), दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय (सुनसगाव) यांचा समावेश आहे. या चार शाळांना देशातील नामवंत वैज्ञानिकांच्या हस्ते ऑनलाइन ॲफिलेशन सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. त्यामुळे आता शाळांमध्ये विविध वैज्ञानिक ॲक्टिव्हिटी राबविण्यात येणार आहेत.

ऑनलाइन आयोजित कार्यक्रमांमध्ये इंडियन प्लॅनेटोरियम सोसायटी (मुंबई) चे अध्यक्ष जे. जे. रावल, इस्रोचे एक्स सायंटिस्ट जयंत जोशी, एनसीआरटी नवी दिल्लीचे गणित विभागाचे प्रमुख टी. पी. शर्मा विज्ञान प्रसारचे वैज्ञानिक बी. के. त्यागी रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, एनसीटीएसचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील एपीजेकेवायएसचे नॅशनल डायरेक्टर गजेंद्र जेपाला कलाम चिल्ड्रन सायन्टिस्ट सेंटरचे राष्ट्रीय डायरेक्टर भगवान भाई, नॅशनल प्रोजेक्ट ॲकॅडमीचे सेक्रेटरी सुनील वानखेडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या या बालवयापासून कृतीयुक्त शिक्षण, प्रकल्पाधारित शिक्षण, मॉडेल मेकिंग आदींमध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने देशभरातील ५० शाळांमध्ये कलाम चिल्ड्रन सायन्स सेंटर सुरू करण्यात आले.

या सेंटरला रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रयोगाचे साहित्य सेंटरला पुरविण्यात येणार आहे. सेंटरमध्ये विद्यार्थी स्वतः येऊन विज्ञानाचे विविध प्रयोग करून त्या मागील वैज्ञानिक कारण समजून घेणार आहे. या पन्नास शाळांमध्ये जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे.

प्रोजेक्ट सेक्रेटरीपदी वानखेडे

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे महाराष्ट्र डायरेक्टर सुनील वानखेडे यांची पदोन्नती कलाम सायंटिस्ट सेंटरच्या प्रकल्पाच्या नॅशनल प्रोजेक्ट सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. याबाबतचे सन्मानपत्र त्यांना ऑनलाइन ‘इस्रो’चे एक्स सायंटिस्ट जयंत जोशी यांनी कार्यक्रमात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT