Sharad Pawar  esakal
जळगाव

Jalgaon Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी जळगावला मुक्कामी थांबणार; नाराजांशी चर्चेसह व्यूहरचनेवर भर

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या शुक्रवारी (ता. ३) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, ते येथे मुक्कामी थांबणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या शुक्रवारी (ता. ३) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, ते येथे मुक्कामी थांबणार आहेत. नाराजांशी चर्चेसह निवडणुकीच्या रणनीतीविषयी ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (Senior leader Sharad Pawar will stay at Jalgaon on Friday)

श्री. पवार आपल्या पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर सभा घेत आहेत. काही ठिकाणी मुक्काम करून ते आपल्या पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काही रणनीतीही आखून देत आहेत. परिसरातील काही लोकांच्या भेटीगाठी घेऊन चर्चाही करीत आहेत.

शुक्रवारी (ता. ३) रावेर मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळावर ते सकाळी दहाला येतील. अकरा ते दुपारी एकपर्यंत चोपडा येथे जाहीर सभा, साडेतीन ते साडेचारपर्यंत भुसावळ येथे सभा, तर सायंकाळी सात ते रात्री आठपर्यंत मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेणार आहेत. (Latest Marathi News)

मान्यवरांशी भेटी अन चर्चा

मुक्ताईनगरातील सभा आटोपल्यावर शरद पवार जळगाव येथे रात्री मुक्कामी असणार आहेत. या वेळी ते काहींच्या भेटीही घेणार असल्याचे सांगण्यात येते. काही जणांशी चर्चा करणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार उमेदवार आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या यशासाठी शरद पवार काय रणनीती ठरवितात, याकडे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT