Cows on the farm. esakal
जळगाव

Jalgaon Drought News : बळीराजाची आर्त हाक; चाळीसगाव तालुक्यात गुरे जगविण्यासाठी धडपड

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीत शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे.

दीपक कच्छवा : सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे : यावर्षी चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीत शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला चारा संपत आल्याने चाराटंचाईने शेतकरी पशुपालक त्रस्त झाले आहेत. या उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्याचे व चाऱ्यांचे वाढलेले भाव, या विविध कारणांमुळे गुरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. (severe drought situation has arisen in Chalisgaon taluka)

या भागात आलेले काठेवाडी, मेढपाळांनाही दुष्काळाच्या झळा बसत आहे. शासनाने ज्या भागात चाराटंचाई आहे, अशा भागात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे चटके बसत असून, चारा व पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्याला आता गिरणा परिसर देखील अपवाद राहिलेला नाही.

या भागाला गिरणा नदी वरदान ठरल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस व केळीची लागवड केली आहे. पाण्याअभावी सद्यःस्थितीत कच्च्यापक्क्या उसाची तोड करून विक्री केली जात आहे. उसाच्या चाऱ्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. चारा म्हणून विकला जाणारा ऊस कमीत कमी २ हजार ६०० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार ८०० रुपये टन दराने विकला जात आहे.

जेमतेम शिल्लक चारा

उसाची बांडी व पाचटसह वजन केले जात असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत आहे. काहींनी तीन हजार रुपये दराचा भाव मिळेल या आशेने ऊस विकला जाईल, यासाठी उसाचे क्षेत्र राखून ठेवले आहे. हा चारा धुळे जिल्ह्यातील शिरूड, तरवाडे, मालेगाव व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या घेऊन जाताना दिसत असले तरी तो देखील जेमतेम आहे. यावर्षी चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक चाराटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने चाराटंचाई संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (latest marathi news)

जनावरांची संख्या घटली

दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट फटका गायी, म्हशी, बैलांसारख्या गुरांना बसत आहे. या गंभीर परिस्थितीत रोजच्या रोज पशुखाद्याचे व चाऱ्यांचे भाव वाढत आहेत. या अशा कारणांमुळे गुरांची संख्या घटत आहे. ग्रामीण भागात २०१२ च्या पशु गणनेनुसार गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या १ लाख ६५ हजार ८१९ आहे.

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील गोशाळेवर गोसेवक रविदास महाराज यांना सध्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे तेथे गाईंची सेवा करणारे अमोल महाराज यांना सध्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ज्या भागात चारा टंचाईची स्थिती गंभीर आहे, अशा ठिकाणी प्रशासनाने चाऱ्याची छावण्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

पशुधन विक्रीला; शेतकरी चिंतीत

उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरींना पाणी नाही, बोअरवेल आटल्या आहेत. त्यामुळे शेतामध्ये ओलिताचे क्षेत्र कमी झाले आहे. गुरांसाठी चारा व पाणी समस्या निर्माण झाली आहे. एकेकाळी साठ रुपये शेकडा याप्रमाणे कडबा कोणी विकत घेत नव्हते. आज हाच कडब्याचा चारा आजच्या परिस्थितीत दोन हजार ते अडीच हजार रुपये अधिक दराने विकला जात आहे. नियोजनाचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटविले आहे.

त्यामुळे चारा टंचाईचा फटका सहन करावा लागत असून, गुरे सांभाळणे कठीण झाल्याने अनेकांनी आपली गुरे विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गुरांच्या पाण्याची भीषण समस्या उद्भवली आहे. गावागावांतील तलाव, नदी, नाले व बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या गुरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : ठाकरे गट १४ सप्टेंबर रोजी करणार आंदोलन, भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT