Ongoing auction in Shajapur and Vani...onion market esakal
जळगाव

Jalgaon Onion News : चाळीतला कांदात् भाव खाण्याची चिन्हे! उत्पादकांना दिलासा; राज्यासह मध्य प्रदेशातही भावात वाढ

Jalgaon News : राज्यातील कांदा बाजारपेठांसह मध्य प्रदेशातील काही कांदा बाजारांमध्ये भावात दोन-तीन दिवसांत वाढ होऊन कांदा तेजीकडे जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता. चोपडा) : गेल्या उन्हाळी हंगामाचा कांदा काही शेतकऱ्यांनी निघताच न विकता चाळीत भरून ठेवला आहे. त्याची वेळोवेळी निगा ठेवल्याने तो अजून बऱ्यापैकी आहे. तो कांदा चाळीत भरण्यामागे भावात वाढ होऊन काहीशी किंमत जास्त मिळेल, हीच आशा होती, ती फलद्रूप होण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत. (Jalgaon Signs of Chawl onions rates hike)

राज्यातील कांदा बाजारपेठांसह मध्य प्रदेशातील काही कांदा बाजारांमध्ये भावात दोन-तीन दिवसांत वाढ होऊन कांदा तेजीकडे जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. गेल्या दोन-चार दिवसांत कांद्याच्या भावात वाढ होत आहे. उन्हाळी हंगामात निघालेला कांदा खानदेशातील बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांनी जागेवर पाचशे ते सहाशे तीस रुपये प्रतिगोणी म्हणजे तेराशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटलने विक्री केला.

अर्थात कांद्याचे अर्थकारण पाहता कांदा पिकविण्यात खूप खर्च येत असल्याने पीक निघाल्यानंतर तो खर्च देण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना कांद्याची जागेवर निघतानाच विक्री करावी लागते. मात्र, काही शेतकरी त्यातील थोडा कांदा काढून चाळीत किंवा योग्य ठिकाणी भरून ठेवतात. या भरून ठेवलेल्या चाळीतल्या कांद्याला सध्या चांगले दिवस येतील, अशी आजच्या घडीची स्थिती निर्माण होत आहे. (latest marathi news)

आज शाजापूर (मध्य प्रदेश) मंडित कांदा दोन हजार सातशे ते तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला, तर राज्यातील लासलगावसह अन्य बाजार समितीमध्ये व वणी बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार सातशे ते दोन हजार ८५० रुपयांचे भाव होते. अर्थात कांद्याची प्रत पाहूनच कांद्याला भाव मिळत आहे.

त्या खालील भावातही कांदा विक्री झाल्याचे तेथील व्यापाऱ्यांनी सांगितले. उच्चप्रतीचा व लाल कांदा असल्यास त्याला चांगले भाव मिळत आहे. भाव वाढत असल्याने शेतकरी आता हळूहळू चाळीतील कांदा थोडा थोडा करून विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT