Smita Wagh esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभेची उमेदवारी बदलणार नाही : स्मिता वाघ

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आता बदलली जाणार नाही, असे मत पक्षाच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आता बदलली जाणार नाही, असे मत पक्षाच्या उमेदवार माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले. उमेदवारी बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी आज आपले स्पष्ट मत व्यक्त केले. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Jalgaon Smita Wagh statement Lok Sabha Election candidate will not change)

त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत नाराजी असल्याची पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार ए. टी.पाटील उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपने स्मिता वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द केली होती.

याबाबत जळगाव येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना वाघ म्हणाल्या, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी प्रचाराला सुरूवात केली आहे. मी लोकांपर्यंत पोहोचते आहे. लोक म्हणत आहेत, पक्षाने लोकसभेची उमेदवारी देवून तुम्हाला न्याय दिला आहे. जळगाव लोकसभेच्या उमेदवारी बदलाबाबत त्या म्हणाल्या, जळगाव लोकसभेचे तिकीट बदलले जाणार नाही. (latest marathi news)

गिरीश महाजन यांनी चार पाच दिवसांपूर्वीच सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत तिकीट बदलले जाणार नाही, उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत हे चालणारे चक्र आहे, प्रत्येकाला उमेदवारीची इच्छा असते. त्यामुळे व्यक्ती बोलत असतात. परंतु ही राष्ट्रीय पार्टी आहे, एकदा निर्णय बदलला म्हणजे दरवेळी तसेच होईल असे काही नसते.

माझ्या मते जळगाव लोकसभेचे तिकीट बदलण्याची आता कोणत्याही परिस्थितीत शक्यता नाही. जळगाव मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी खासदार ए. टी.पाटील यांची व माझी भेट झाली तेव्हा ते म्हणाले, ताई मी तुमच्या सोबत आहे. ते ज्यावेळी दहा वर्षे खासदार होते. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची धुरा आम्ही सांभाळली आहे. त्यामुळे आताही ते महायुती व पार्टीसोबतच राहतील, असेही स्मिता वाघ यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT