While saying goodbye to the child, the founder Dr. Girish Thakur etc. esakal
जळगाव

Jalgaon News : सर्पदंश झालेल्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाला यश

Jalgaon News : २८ जूनला सकाळी सहाच्या सुमारास भुसावळ येथील ९ वर्षीय तनिश दिनेश पाटील याला सापाने दंश केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ येथील ९ वर्षीय मुलाला विषारी साप चावल्यावर त्याची प्रकृती खालावत होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागातील वैद्यकीय पथकाने त्या मुलावर यशस्वी उपचार करून त्याचे प्राण वाचविले. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाचे कौतुक केले. (Jalgaon Snake bitten child saved from jaws of death )

२८ जूनला सकाळी सहाच्या सुमारास भुसावळ येथील ९ वर्षीय तनिश दिनेश पाटील याला सापाने दंश केला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोगशास्त्र विभागात दाखल केले होते. त्याची प्रकृती खालावल्याने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवले होते.

५ दिवस सातत्याने बालरोग विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक उपचार करीत होते. अतिदक्षता विभागात ४ दिवस ऑक्सिजन देऊन त्याच्यावर उपचार करून सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. तो मूळ स्थितीत येऊन बरा झाला. (latest marathi news)

मुलगा मृत्यूच्या दाढेतून परतल्यामुळे नातेवाइकांनी आनंदित होऊन अधिष्ठाता डॉ. ठाकूर, बालरोगशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. सुरोशे, सहाय्यक प्रा. डॉ. गिरीश राणे यांच्यासह नर्सिंग स्टाफचा सन्मान केला. डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा चांडक, डॉ. कौस्तुभ चौधरी, डॉ. मयूर घुगे, डॉ. अनिरुद्ध कारंडे, डॉ. सुरसिंग पावरा, डॉ. प्रतिभा कदम, डॉ. रितेश पांडे, डॉ. शुभम चव्हाण आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supe ST Bus Accident : सुपे घाटात एसटी बस उलटून अपघात आठ विद्यार्थी किरकोळ जखमी, दोन गंभीर, उपचार चालू

DengiAll: डेंग्यूला घाबरण्याचे दिवस संपणार? भारताची पहिली स्वदेशी लस ‘DengiAll’ लवकरच येणार

Bombay High Court : चोवीस आठवड्यांनंतर परवानगी बंधनकारक का? गर्भपातासंबंधीच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

SCROLL FOR NEXT