schools sakal
जळगाव

राज्यातील अनेक माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेला लागला ब्रेक..!

कार्यरत पदांची माहिती अपूर्ण, वारंवार सूचना देऊनही कार्यवाही नाही

उमेश काटे

अमळनेर : राज्यातील १६ हजार ६७० माध्यमिक शाळांपैकी १२ हजार २१६ शाळांनी कार्यरत पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करुन अंतिम केली आहे. त्यामुळे त्या शाळांना सन २०१९ -२० व २०२०-२१ च्या संचमान्यता मिळाल्या आहेत. मात्र वारंवार सूचना देऊनही राज्यातील २ हजार ७१९ माध्यमिक शाळांकडून सन २०१९ -२० ची व ४ हजार ५३० माध्यमिक शाळांकडून २०२०-२१ ची कार्यरत पदांची माहिती अपूर्ण आहे. त्या शाळांनी ही माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करुन अंतिम करण्यात आली नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

एनआयसी (पुणे) यांच्या कडून सन २०१९ -२० व २०२०-२१ संचमान्यता उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. ब-याच शाळांनी कार्यरत पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करुन अंतिम केली नसल्याने त्या शाळांच्या २०१९ -२० व २०२०-२१ च्या संचमान्यता जनरेट होऊ शकलेल्या नाहीत . २०१९ -२० व २०२०-२१ संचमान्यतेकरिता कार्यरत पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करुन अंतिम करण्यासाठी वारंवार व्ही.सी. द्वारे घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार १६ हजार ६७० माध्यमिक शाळांपैकी १२ हजार २१६ शाळांनी वर्कीग पोस्ट माहिती फायनलाईज केल्याने त्यांना सन २०१ ९ -२० व २०२०-२१ च्या संचमान्यता मिळाल्या आहेत. मात्र वारंवार सूचना देऊनही अद्यापही राज्यातील २ हजार ७१९ माध्यमिक शाळांकडून सन २०१९ -२० ची व ४ हजार ५३० माध्यमिक शाळांकडून २०२०-२१ ची वर्कीग पोस्टची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करुन अंतिम करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे . वर्कीग पोस्ट भरण्याची सुविधा ही शाळास्तरावर मुख्याध्यापक लॉगीनला असून ती संबंधित शाळा मुख्याध्यापक यांचेकडून भरुन अंतिम होणे आवश्यक आहे. तथापि संबंधित शाळा मुख्याध्यापक यांचेकडून सदर जबाबदारी पार पाडली जात नसल्याचे दिसून येत आहे . तरी २०१९ -२० व २०२०-२१ संचमान्यतेकरिता वर्कीग पोस्टची माहिती भरुन सदर माहिती फायनलाईज करण्याची कार्यवाही सप्टेंबर २०२१ अखेर पूर्ण करण्याबाबत माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

..... अन्यथा मुख्याध्यापकांचे पगार थांबणार ?

ब-याच शाळांनी कार्यरत पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंद करुन अंतिम केलेली नाही, त्या शाळांनी दिलेल्या मुदतीत वर्कीग पोस्ट फायनलाईज करण्याची कार्यवाही करण्यात येणार नाही त्या संबंधित शाळा मुख्याध्यापकाचे ऑक्टोंबर २०२१ चे वेतन अदा केले जाणार नाही. याबाबतच्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी संबधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT