Employees of Market Committee while giving statement against amendment of Marketing Act.  esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Jalgaon : संचालक व कामगार संघटनांकडून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सोमवारी (ता. २६) बंद ठेवण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी संचालक व कामगार संघटनांकडून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज सोमवारी (ता. २६) बंद ठेवण्यात आले आहे. या आंदोलनामुळे कोट्यवधींंची उलाढाल ठप्प झाली. (Jalgaon Strict shutdown in district market committee)

चोपडा येथे महाराष्ट्र विधानसभा विधेयक (२०१८) क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणांच्या अनुषगांने कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी, अडते, हमाल, मापाडी आदी घटकांवर याचा परिणाम होणार असल्याने शासनाने सध्याचे कायद्यात बदल करू नये.

यासाठी सोमवारी (ता. २६) बाजार समितीत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या मध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी सहभागी झाले होते. कार्यालयीन कामकाज व खरेदी विक्रीचे संपूर्ण व्यवहार बंद होते. यात व्यापारी, अडते, हमाल, मापाडी यांनी या लाक्षणिक संपात सहभागी होते.

अमळनेरला ‘तहसील’वर धडक

अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी, हमाल, मापाडी, गुमास्ता तसेच कर्मचारी संघटनेने सोमवारी (ता. २६) काम बंद आंदोलन पुकारून बाजार समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार आर. एस. जोशी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

दरम्यान, या मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २९) तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यानंतरही विधेयक रद्द न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा, व्यापारी संचालक वृषभ पारख, प्रकाश वाणी, हमाल संघटनेचे अध्यक्ष रमेश धनगर, संचालक शरद पाटील, मापाडी संघटनेचे अध्यक्ष महादू पाटील, कार्यध्यक्ष प्रभाकर पाटील, गुमास्ता संघटनेचे युवराज पाटील, कर्मचारी संघटनेतर्फे बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेषकुमार राठोड.

सहसचिव सुनील सोनवणे, उपसचिव अशोक वाघ, योगेश महाजन, प्रशांत राणे, डिगंबर पाटील, सुरेश शिरसाठ, गणेश पाटील, पंकज बाविस्कर, प्रशांत नेरकर, योगेश इंगळे, नीलेश पाटील, दिनेश पाटील, नरेंद्र धनगर, दिपेंद्र पवार, आबा बावा यांच्यासह सर्व व्यापारी, हमाल, मापाडी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनात होत्या.

पारोळ्यात उलाढाल ठप्प

पारोळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रस्तावित विधेयकाविरोधात सोमवारी (ता. २६) एक दिवसीय बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले. या बंदमुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले. बाजार समितीच्या बंदला सभापती डॉ. सतीश पाटील, उपसभापती सुधाकर पाटील यांच्यासह संचालक मंडळाने पाठिंबा दिला आहे. या एकदिवसीय संपात बाजार समितीचे सचिव दीपक मोरे, बाजार समिती कर्मचारी तसेच व्यापारी अडत दुकानदार हमाल व शेतकरी सहभागी होते.

बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

मुक्ताईनगर : शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा; अन्यथा बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिले होते.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कडकडीत बंद पाळला असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली आहे. माथाडी, हमाल आणि व्यापारी यांनीही या आंदोलनास पूर्ण पाठिंबा दिला. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT