student protest  esakal
जळगाव

Jalgaon News : लाडक्या बहिणींनी केली ‘एसटी’ फुल्ल; गर्दीमुळे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचा ‘रास्ता रोको’

Jalgaon : अंजनसोडे गावात बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी चक्क रास्ता रोको करीत तासभर बस अडवून धरली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचा कागदपत्रे गोळा करण्यासाठी किंवा तालुक्याला अर्ज करण्यासाठी बसप्रवास वाढला आहे. बसमध्ये गर्दी होऊ लागल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. दुसरीकडे अंजनसोडे गावात बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी चक्क रास्ता रोको करीत तासभर बस अडवून धरली. मात्र, बसचे चालक आणि वाहक यांनी विद्यार्थांची समजूत काढून बस पुढे नेली. (student protest on road due to st full )

तालुक्यातील सावतरनिंभोरा, कठोरा बुद्रुक, कठोरा खुर्द आणि अंजनसोडा या'चार गावांमधील शेकडो मुले- मुली वरणगाव येथे बसने प्रवास करून शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र बस आधीच तीन गावांचे विद्यार्थी घेऊन येत असल्याने अंजनसोडा येथील विद्यार्थी मुले-मुलीना बसमध्ये चढता येईना एवढी गर्दी असते. अंजनसोडा येथील विद्यार्थ्यांना बस नसल्याने शाळेला जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

बसअभावी अनेक मुलींवर शिक्षण बंद होण्याची वेळ आली आहे. वारंवार अर्ज विनंती करूनदेखील कोणतीही दखल घेतली जात नाही. लवकरात लवकर बसच्या एकाच वेळी दोन फेऱ्या सुरू केल्या नाही, तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर आंदोलन केले जाईल, असा इशारा अजंनसोड्यातील गावकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक मधुकर चौधरी यांनी सांगितले, की बस आगारप्रमुखांकडे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला केलेल्या ठरावानुसार शाळेच्या वेळेत एकाच वेळी दोन बसची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मंजुरी दिली आहे. तर आगारप्रमुख राकेश शिवदे म्हणाले, वरणगाव मार्गे सावतरनिभोंरा बस सुरू असून आजपर्यंत अडचणी आल्या नाहीत. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे महिला प्रवासी वाढल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. मागणीनुसार बस वाढवून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT