dengue esakal
जळगाव

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Jalgaon : जनजागृती अभियानामुळे डेंग्यूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : डेंग्यूबाबत शहरी भागासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने गेल्या काही वर्षांपासून राबविलेल्या जनजागृती अभियानामुळे डेंग्यूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. डेंग्यू दिनानिमित्त गेल्या तीन वर्षांत ज्या घटकामुळे डेंग्यू होतो, त्यासंबंधी पाण्याचे नमुने व तपासणीच्या अहवालात २०२२- २३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दूषित पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. ( Success of health system measures against dengue)

डेंग्यू हा जीवघेणा आजार. आपल्या घरात, अंगणात, वस्तीतील दूषित पाण्यातून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूच्या विषाणुचा प्रसार होतो. डेंग्यू नियंत्रणासाठी १६ मे हा दिवस साजरा केला जातो. त्यात लोकांना आजराबद्दल जागरूक करून, त्या आजाराची प्रमुख लक्षणे, कारणे व उपचाराबद्दल सखोल माहिती देणे आदी उद्देश आहे.

डेंग्यूवर यशस्वी नियंत्रण

गेल्या काही वर्षांपासून आरोग्य यंत्रणेने डेंग्यू नियंत्रणाठी उपाययोजना आखून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असले, तरी अद्यापही विशेषत: पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. गेल्या तीन वर्षांत डेंग्यूबाबत केलेल्या सर्वेक्षणात प्रत्येक वर्षी दूषित पाण्याचे नमुने आढळून येण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.

अशी झाली घट

२०२२ मध्ये शहरी भागातून २०० नमुने घेण्यात आले. पैकी ८७ दूषित निघाले. तर ग्रामीण भागातून घेतलेल्या २५७ पैकी ५८ नमुने दूषित आढळले. २०२३ मध्ये वर्षभरात शहरी भागातून ६६७ नमुने घेण्यात आले. पैकी ६१ दूषित, तर ग्रामीण भागातून पाण्याच्या ८८५ नमुन्यांमधून ७२ दूषित आढळले. यंदा मे २०२४ अखेर पाच महिन्यांत शहरी भागातून केवळ १३ नमुने घेण्यात आले. त्यातील १ नमुना दूषित होता, तर ग्रामीण भागातून पाण्याचे ९७ नमुने घेऊन तपासणी केली असता, ७ नमुने दूषित आढळले आहेत. (latest marathi news)

असा होतो प्रसार

एडिस डासांची उत्पत्ती स्वच्छ आणि आठ दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवलेल्या पाण्यातच होत असते. उदा. सिमेंटच्या टाक्या, हौद, रांजण, प्लॅस्टिकच्या रिकाम्या बादल्या, नारळाच्या कारावंट्या, घरातील फुलझाडे असलेली कुंड्या, कुलर्सचे पाणी, फ्रीजचे भांड्याचे पाणी, गाडीचे खराब टायर्स, निरूपयोगी भंगार साहित्य आदींमध्ये जास्त वेळ साठलेल्या पाण्यात एडिस डासांची मादी अंडी घालते, यातूनच मोठ्या प्रमाणात फैलाव होतो. लहान मुले, गरोदर माता, वयस्कर लोकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या आजाराची बाधा लवकर होते.

अशी आहेत लक्षणे

-रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरूपाचा ताप असणे

-डोके, सांधे, स्नायू दुखीचा तीव्र त्रास

-रुग्णास उलट्या होतात, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे

-अंगावर पुरळ येणे, नाक-तोंडातून रक्तस्त्राव, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे

या करा उपाययोजना

-साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावीत

-कुलरचे पाणी बदलवत राहणे

-फ्रीजच्या मागील पाणी फेकून द्यावे

-सायंकाळी दारे, खिडक्या बंद करावेत

-दार, खिडक्यांना जाळी बसवावी

-झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा

-डासांचा उपद्रव रोखण्यासाठी कॉइल, मच्छर अगरबत्ती लावणे, अंगाला मलम लावणे

-घराभोवताली अजिबात पाणी साचू देऊ नका

-पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करून भांड्यातील पाणी (उदा. रांजण, हौद, टाक्या) आदी सर्वांची तळापासून स्वच्छ घासून कोरडे करून मगच वापरावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT