Summer Drink  esakal
जळगाव

Summer Health Tips : कैरी, चिंच, गुळाचे पन्हे उन्हाळ्यात घ्याच! आयुर्वेदाचार्याचा सल्ला

Jalgaon News : उन्हाळा सुरू होताच बाजारात कच्ची कैरी, चिंचा, कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उन्हाळा सुरू होताच बाजारात कच्ची कैरी, चिंचा, कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते. कडाक्याच्या वाढत्या उन्हाला तोंड देण्यासाठी शरीर आतून मजबूत आणि थंड राह‌णे आवश्यक असल्याने, घरगुती कैरीचे आणि चिंच, गुळाचे पन्हे आरोग्यदायी असल्याचे आयुर्वेदाचार्य आवर्जून सांगतात पन्हे हे शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. (Summer Health Tips)

त्यातून उन्हामुळे शरीराची कमी झालेली ऊर्जा भरून काढण्याचे काम पन्हे करतात. त्यासाठी कडक उन्हाळ्यात शरीराला कूल ठेवणारे पन्हे घेतलेच पाहिजे. उन्हाळ्यात भूक मंदावलेली असते. जेवणाची फार इच्छा होत नाही, पोटाला भर म्हणून आहार घेतला जाते. अशा वेळी शाळा-कॉलेज, नोकरी-कामानिमित्त उन्हातान्हात फिरताना शरीरातील ऊर्जा कमी होऊन शरीराला ग्लानी येऊन एक प्रकारचा चकवा येतो.

कोणतेही काम करण्याचा उत्साह राहत नाही. अशा वेळी काहीतरी गरम खाण्यापेक्षा थंड पिण्याची इच्छा होते. पावले आपोआप रसवंतीगृह, ताक, बर्फाचा गोळा, आइस्क्रीम, कुल्फी घेण्याकडे कळतात. याउलट कैरी आणि चिंच गुळाचे पन्हें शरीराला अधिक फायदेशीर उरतात.

शिवाय यू-ट्यूबवर पन्हे बनविण्याची असंख्य रेसिपी असल्याने प्रत्येकवेळी नवनवीन प्रयोग उकडलेल्या कैरीचे पन्हे, चिंच गूळ भिजवून केलेले पन्हे असे अनेक प्रकार यूट्यूबवर सहज पाहायला मिळतात. बाजारात कैरीची आवक वाढल्याने लोणचे.

मुरब्बा त्याचबरोबर कैरीपासून विविध पदार्थ बनविता येत असल्याने गृहिणीचा कल कैरी, चिंचा खरेदीकडे वाढला आहे. पन्ह्यासारखे आरोग्यदायी पेय पिल्याने शरीराला तरतरी येते. शिवाय दोन जेवणाच्यामध्ये शरीराला थंड ठेवणारे पेय जास्त गरजेचे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

"पन्हे घेतल्याने शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे उष्माघात होण्यापासून शरीराचा बचाव होतो. कच्च्या कैरीत फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट अधिक असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. विविध प्रकारचे पन्ह्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते."- डॉ. अभिजित अहिरे, प्रभारी डीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसामुळे मिळालेल्या मदतीची रक्कम वजा करून मदत दिली जात - संजय पाटील घाटणेकर

पिंम्पल्स असलेली हिरोईन आम्ही का पाहायची... शिवानीला झालेल्या ट्रोलिंगवर अमित म्हणतो- तिच्या चेहऱ्यावर लिच लावले...

Tomorrow Horoscope Prediction : उद्या तयार होतोय अत्यंत शुभ सर्वार्थ सिद्धी योग, 5 राशींवर भगवान विष्णूची कृपा

SCROLL FOR NEXT