Jalgaon Summer Heat  esakal
जळगाव

Jalgaon Summer Heat : तापमानवाढीचा लहान मुलांना सर्वाधिक फटका

Jalgaon News : पावसाने हजेरी लावल्याने झालेल्या वातावरणातील बदल आणि वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका मुलांना बसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वावडे : गेल्या काही दिवसांपासून तापमान कमालीचे वाढले आहे. त्यात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने झालेल्या वातावरणातील बदल आणि वाढत्या उन्हाचा सर्वाधिक फटका मुलांना बसत आहे. सर्दी, खोकला, तापासह निमोनिया, मेंदूज्वर, उलट्या-जुलाबाच्या त्रासाने बालके चांगलीच हैराण झाली आहेत. (Children are most affected by increase in temperature)

तापमान वाढीचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. वाढत्या उन्हाने डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळी लागणे, ॲसिडिटी, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, थकवा जाणवणे या समस्या उ‌द्भवतात.

मुले ऑक्सिजनवर आहेत. मेंदूज्वर, निमोनियासह विविध आजारांनी ग्रस्त मुलांचा यात समावेश आहे. वातावरणातील बदलामुळे मुलांच्या शरीरावर होतोय परिणाम, मुले उन्हात खेळणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यावी, मुले पुरेशा प्रमाणात पाणी पितात की नाही, याकडे लक्ष द्यावे.

अशी घ्यावी काळजी

मुले उन्हात जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, मुलांना भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ द्यावे. सध्या सर्दी, खोकला, तापेसह जुलाब उलट्यांचा त्रास मुलांमध्ये अधिक आहे, मुलांच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मुलांना भरपूर पाणी द्यावे, थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात, तरीही ताप उतरत नसेल तर, कांद्याचा रस अंगाला लावायचा. उष्माघाताचा त्रास जाणवत असेल तर, रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे. (Latest Marathi news)

"लहान बालकांना उन्हात खेळू देऊ नका, त्यांना दुपारी शक्यतोवर घरातच राहण्याचा सल्ला द्यावा, जेणेकरून त्यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही. काही कारणास्तव बाहेर गेल्यास भरपूर पाणी प्यावे, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही." - डॉ. शरद बाविस्कर, बालरोग तज्ज्ञ, अमळनेर

खासगी रुग्णालये फुल्ल

गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने लहान बालकांना तापमान असह्य होत असून, त्यांची प्रकृती खराब होत आहेत. त्यातच शासकीय रुग्णालयातही तापामुळे बालके उपचारार्थ आल्याचे दिसून आले. यात सध्या मळमळ, उलटी, जुलाबाच्या बाल रुग्णांची संख्या वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT