Such an afternoon rush on the highway. esakal
जळगाव

Summer Heat : जळगावचे तापमान पोचले 42 अंशांवर; तापमानाची वाटचाल उच्चांकाकडे

Summer Heat : शहराच्या तापमानाची वाटचाल ४५ अंशांकडे सुरू झाली असून, मंगळवारी (ता. २६) जळगाव शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले.

सकाळ वृत्तसेवा

Summer Heat : शहराच्या तापमानाची वाटचाल ४५ अंशांकडे सुरू झाली असून, मंगळवारी (ता. २६) जळगाव शहराचे तापमान ४२ अंश नोंदविले गेल्याची माहिती वेलनेस फाउंडेशनचे संचालक, हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिली. मार्च महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला, तर एप्रिल, मे महिन्यांत उन्हाची दाहकता कशी असेल यांची चिंता जनतेला लागून आहे. (jalgaon Summer Heat temperature of Jalgaon reaches 42 degrees marathi news)

जळगाव जिल्हा दर वर्षी ‘हॉट’ ठरतो. गत वर्षी तापमान ४५ अंशांपर्यंत गेले होते. यंदाही ‘अलनिनो इफेक्ट’मुळे ते ४५ किंवा त्याहीपेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. ‘अलनिनो इफेक्ट’मुळे गत वर्षी एप्रिल महिन्यात पाऊस पडला होता, तर मॉन्सूनची वाटचाल तब्बल एक महिना उशिराने झाली होती. यंदा मात्र ‘अलनिनो इफेक्ट’ पावसाला बाधक ठरणार नाही. (latest marathi news)

यामुळे वेळेवर पाऊस सुरू होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. असे असले तरी मार्च महिन्यातच तापमान ४२ अंशांपर्यंत पोचल्याने आगामी एप्रिल व मे महिना अधिक उष्णतेचा असेल. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना सुरू केली आहे.

जिल्ह्यातील तापमान

४२ अंश ः जळगाव, भुसावळ, भडगाव, चोपडा, धरणगाव, जामनेर, पारोळा, पाचोरा, रावेर, वरणगाव

ः४१ अंश ः अमळनेर, बोदवड, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, यावल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT