Social activist Sunil Ramoshi while giving information in a press conference. Neighbors Leeladhar Patil and villagers. esakal
जळगाव

Jalgaon News : सार्वजनिक सुविधांपासून सावखेडे तुर्क गाव वंचित : सुनील रामोशी

Jalgaon News : जलजीवन योजनेचा लाभ व सार्वजनिक सुविधा उपलब्ध न झाल्यास ग्रामस्थांच्या मदतीने महामार्गावर व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील रामोशी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर असलेले सावखेडे तुर्क हे गाव सार्वजनिक सोयी सुविधांपासून वंचित आहे. जलजीवन योजना गावात फक्त कागदावर राबवली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून गावाचा सोयीसुविधांबाबत विचार होत नाहीये. जलजीवन योजनेचा लाभ व सार्वजनिक सुविधा उपलब्ध न झाल्यास ग्रामस्थांच्या मदतीने महामार्गावर व्यापक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील रामोशी यांनी पत्रकार परिषदेत दिला. (Savkhede Turk village deprived of public facilities)

येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता.२०) आयोजित या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते लीलाधर पाटील, नितीन पाटील, विनोद मराठे हेही उपस्थित होते. रामोशी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गालगतच सावखेडे तुर्क गाव असूनही प्रवाशांसाठी बसथांबा नाही. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग गावालगत असूनही पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून झाली नाही.

गाव महामार्गालगत असतानाही पथदिवे नसल्याने अपघाताची भीती आहे, गावाचे दिशादर्शक फलकही नसल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी नजीकच्या शाळेत शिरत असल्याने चारही महिने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार आहे.

जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला दोन वर्षांपासून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ठेकेदारांचा वारंवार पाठपुरावा करूनही गावात कामाला सुरुवात झाली नाही. तीन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने जलकुंभासाठी अंगणवाडी परिसरात खोल खड्डे खोदले. (latest marathi news)

परंतु, परिसरातील अंगणवाडी व शाळेतील बालकांचा येथे नेहमीच वावर असल्याने खड्ड्यात पडून जीविताला धोका होऊ शकतो. ठेकेदाराने आपल्या लाभापोटी प्रत्यक्षात कुठलेही काम केले. कागदावर काम दाखवत बिल पारित झाल्याचा आरोपही सुनील रामोशी पत्रकार परिषदेत केला.

योजना मंजूर होऊनही दोन वर्षांपासून गावकरी पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. म्हणून जलजीवन योजनेतील कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास ग्रामस्थांसोबत उपोषण करण्याचा इशारा रामोशी यांनी दिला. दरम्यान, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची भूमिका समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

"सदर गावाला जलजीवन मिशन योजना पूर्ण करणे कामी योग्य नियोजन सुरू आहे. मात्र, पाण्याच्या टाकीच्या जागेस उशीर झाला. त्यामुळे ठेकेदाराला काम करण्यास विलंब झाला. सदर जागी खोदकाम केल्यानंतर काळी माती तेथे आढळून आली. काम प्रगतीपथावर आहे. शिवाय जेवढे काम झाले, तेवढेच बिले संबंधित ठेकेदारास दिली आहेत."

- धीरज पाटील, प्रभारी उपविभागीय अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT