Officials welcoming Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party chief Rajendra Patil. esakal
जळगाव

Jalgaon: विधानसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवारास पाठिंबा! पारोळा येथील बैठकीत चर्चा; शिवसेना UBT पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

Jalgaon News : शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बाजार समितीच्या कार्यालयात ही बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळून महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्याला पाठिंबा देऊन त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करू, असा निर्णय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या येथे आयोजित आढावा बैठकीत सर्वांनुमते

घेण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या मार्गदर्शनाखाली व विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील बाजार समितीच्या कार्यालयात ही बैठक झाली. (Jalgaon Support for candidate of mahavikas aghadi in assembly elections UBT participation)

आगामी विधानसभा निवडणुकीबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शिवसेनेचे पारोळा तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, बाळू पाटील, माजी नगरसेवक पी. जी. पाटील, अनिल पाटील, माजी नगरसेवक रमेश माळी, उपतालुकाप्रमुख दादा पाटील, उपशहर प्रमुख सोमनाथ वाणी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख कलीम शेख, अल्पसंख्यांक उपशहर प्रमुख शकील मामू,. अल्पसंख्यांक उपशहर प्रमुख शफिक बुरांडे, सांगवी येथील प्रवीण पाटील, विभागप्रमुख सुनील येवले , विभागप्रमुख हिरामण पाटील, युवासेना तालुकाप्रमुख रवी पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख महेंद्र पाटील, युवा सेनेचे सनी लोहार, उपशहरप्रमुख लखन वाणी, वाहतूक सेना तालुकाप्रमुख तुषार पाटील, शिवदूत अमोल पाटील, कट्टर शिवसैनिक भूषण टिपरे, व्यापारी सेना शहरप्रमुख विवेक माळी, सोशल मीडियाप्रमुख कृष्णा शिंपी, शेळावे येथील विनोद पाटील, बोळे येथील जितेंद्र राजपूत, दिनेश लोहार, राजू बागडे, कट्टर शिवसैनिक अरुण चौधरी, शिरसमणी येथील भाऊसाहेब पाटील, गोरख पाटील, पळासखेडे येथील पोपट मराठे, बापू पाटील, अभियंता गणेश पाटील, प्रसाद महाजन उपस्थित होते. (latest marathi news)

एरंडोल-पारेाळा मतदारसंघ अनुकूल!

या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाची ठोस कारणे, ज्यात महिला बचतगट विरोधी मजबूत कसे, मतदारसंघनिहाय निकाल बूथप्रमुख बुथच्या ठिकाणी हजर होते का?, महाविकास आघाडीने काम केले का? अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विधानसभेसाठी हा मतदार संघ अनुकूल आहे का? असल्यास कोण मजबूत असू शकतो?, ज्यात डॉ.

हर्षल माने यांचे नाव पुढे करण्यात आले. परंतु, सर्वांनुमते एकच महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला, त्याचे आम्ही प्रामाणिकपणे काम करू, असे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुचित केले. विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात मनमानी खोदाईला ब्रेक! नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम मनपाने थांबवले; आधी रस्ते दुरुस्त करा, मगच पुढचे काम

Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग

Latest Marathi News Update LIVE : : नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेसचा अंतर्गत संघर्ष टोकाला

Leopard Attack:'पती-पत्नीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला'; कोपरगाव तालुक्यातील दाेघे गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा थरार !

SCROLL FOR NEXT