Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : न्यायालयात संशयितांना ‘व्हीसी’द्वारे हजर; भुसावळ गोळीबार प्रकरण

Jalgaon Crime : शहरात पाणी टँकरच्या वादातून बुधवारी (ता. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात पाणी टँकरच्या वादातून बुधवारी (ता. २९) रात्री पावणेदहाच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघेही जागीच ठार झाले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तिघेही संशयितांना शुक्रवारी (ता. ३१) व्हिडिओ कॉन्स्फरन्सींगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. (Suspects appear in court through video call )

या प्रकरणी मुख्य संशयित राजू सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून संशयित शिव पथरोड, विष्णू पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडित, करण पथरोड, नितीन पथरोड व यांच्यासोबत असलेल्या तिघांनी आपसात कट कारस्थान रचून दुचाकीवर येऊन संतोष बारसे (वय ४८), सुनील राखुंडे (वय ४५) कारमधून येत असताना, गोळीबार करून दोघांना ठार केले. या घटनेमुळे भुसावळ शहरात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी चारी बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मात्र, घटनेतील मुख्य संशयित राजू सूर्यवंशी घटना घडल्यापासून फरारी होता. पोलिसांनी तांत्रिक लोकेशनच्या माध्यमातून साक्री येथून राजू सूर्यवंशीला ताब्यात घेतले, तर संशयित विनोद चावरिया यास नाशिकवरून व संशयित करण पथरोड यास भुसावळ शहरातून ताब्यात घेण्यात आले.

तिन्ही संशयितांना शुक्रवारी दुपारपर्यंत पोलिस उपअधीक्षकांच्या दालनात ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शहरातील वातावरण तणावाचे असल्याने काही अप्रिय घटना घडू नये, या अनुषंगाने पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायाधीशांना विनंती केल्याने तिघेही संशयित न्यायालयात उशिरा हजर करणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी दिली.

‘व्हीसी’वरून कामकाज

तिघाही संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री अकरानंतर व्हीसीद्वारे ऑनलाइन न्यायाधीशांसमोर पोलिस हजर करणार असल्याची माहिती उपअधीक्षख कृष्णांत पिंगळे यांनी दिली. हे कामकाज अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी, तसेच अतिरिक्त सत्र न्यायालयात कामकाज चालणार होते.

पोलिस बंदोबस्ताबाबत तक्रार

गोळीबार प्रकरणातील फिर्यादी मिथुन बारसे व त्यांच्या परिवाराला पोलिस बंदोबस्त देण्यात आला नसून, संशयित राजू सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचा आरोप फिर्यादी मिथुन बारसे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT