Dead water reservoir in Tamaswadi (T.Parola) Dam. esakal
जळगाव

Jalgaon: तामसवाडी, भोकरबारी प्रकल्पांत ठणठणात! धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा

Jalgaon News : काही ठिकाणी रिपरिप तर कुठे मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी धरणांमध्ये जेमतेम साठा असल्याने अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

संजय पाटील

पारोळा : शहराला वरदान ठरलेल्या तामसवाडी (बोरी) धरण क्षेत्रात सध्या जिवंत पाणीसाठा शून्य टक्के आहे. दोन महिने उलटूनही जोरदार पाऊस नसल्याने तालुक्यातील धरणे कोरडीच आहेत. काही ठिकाणी रिपरिप तर कुठे मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी धरणांमध्ये जेमतेम साठा असल्याने अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (Tamaswadi Bhokarbari projects in trouble Expect heavy rain in dam area)

तालुक्यात तामसवाडी (बोरी) व भोकरबारी हे जलसाठा उपलब्ध करून देणारे दोन मोठे प्रकल्प आहेत. मात्र या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्यामुळे जिवंत पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आहे. तामसवाडी (बोरी) धरणातून पारोळा शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो.

दरम्यान, बोरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्यास सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन देखील सोडण्यात येत असते. मात्र पुरेसा पाऊस नसल्यामुळे धरणाची स्थिती पाण्यावाचून बिकट आहे. त्यामुळे धरण परिक्षेत्रात

जोरदार पाऊस झाला तर तामसवाडी धरण भरण्यास मदत होते. बोरी धरणात मागील वर्षी जिवंत साठा ६० टक्के होता. यावर्षी जून महिन्यात बोरी धरणाचा जिवंत पाणीसाठा शून्य टक्के होता तर आजपर्यंत (ता. ६) कुठलीही वाढ झालेली नसून हा जिवंत पाणीसाठा शून्य टक्केच आहे. तर मृतसाठा १४.०३० दलघमी आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाहिजे, त्याप्रमाणात जोरदार पाऊस न झाल्यामुळे धरणाची परिस्थिती आज देखील तहानलेली आहे.

रिपरिपमुळे पिके धोक्यात

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अधूनमधून रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढू लागले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे चांगल्या परिस्थितीत असलेली पिके धोक्यात येऊ पाहताहेत. दरम्यान शेतीची अनेक कामे खोळंबली आहेत.

पावसाची उघडीप होईना व शेतमशागतीसाठी मजूर मिळेना, अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटल्यामुळे पीकवाढीसाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. (latest marathi news)

एक मध्यम, चार लघु प्रकल्प कोरडेठाक

पारोळा तालुक्यात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती झाली आहे. त्यातच एक मध्यम प्रकल्प व इतर चार लघु प्रकल्प यांच्या दोन महिने होऊन देखील पाणीसाठा नसल्यामुळे ती पाण्यावाचून तहानलेली आहेत.

यात भोकरबारी मध्यम प्रकल्प, कंकराज, शिरसमणी, बोळे सावरखेडा यार लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान, या परिसरात दमदार पाऊस न झाल्यास येणाऱ्या काळात लघु प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांवर पाणी संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पारोळा तालुक्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती

भोकरबारी : ० टक्के

म्हसवे : ०.०१८ टक्के

कंकराज : ० टक्के

शिरसमणी : ० टक्के

पिंपळकोठा : ५.७२ टक्के

आर्डी : २.१६ टक्के

निसर्डी : ८५.४१ टक्के

बोरी (तामसवाडी) : ० टक्के

बोळे : ० टक्के

सावरखेडा : ० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT