Election  esakal
जळगाव

Teacher Constituency Election : वीस मतदान केंद्रांवर 200 अधिकारी, कर्मचारी! मतदानाच्या वेळेत वाढ

Jalgaon News : निवडणूक आयोगाने नवीन जारी केलेल्या कार्यक्रमानुसार सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बुधवारी (ता. २६) होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात २० मतदान केंद्रांवर प्रत्येकी पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. तब्बल दोनशे कर्मचारी व अधिकारी तैनात केले आहेत. पूर्वी मतदानासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वेळ जाहीर झाली होती. मात्र, निवडणूक आयोगाने नवीन जारी केलेल्या कार्यक्रमानुसार सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. (Jalgaon Teacher Constituency Election)

नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्ह्यातील १३ हजार १२२ मतदारांसाठी २० मतदान केंद्रे आहेत.

असे करावे लागेल मतदान

मतपत्रिकेसोबत जांभळा रंगाचा स्केच पेन पुरविला जाणार आहे. त्याच पेनने उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या रकान्यात इंग्रजी किंवा रोमन भाषेत पसंती क्रमांक लिहावा लागणार आहे. ‘एक’ हा पसंती क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहावा लागणार आहे. त्यानंतर अन्य पसंतीक्रम देता येतील. (latest marathi news)

एखादी खूण केल्यास मतपत्रिका बाद ठरविली जाणार आहे. एखाद्या उमेदवाराला ‘एक’ हा पसंती क्रमांक आकड्यात दिल्यानंतर अन्य उमेदवारांना पसंती क्रमांक देणे ऐच्छिक आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने जागृतपणे मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.

तहसील कार्यालयात मतदान केंद्रे

प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक व प्रत्येकी ३ मतदान अधिकारी, असे पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. बहुतांश मतदान केंद्रे संबंधित तहसील कार्यालयातच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT