Teachers Constituency Election 2024 Sakal
जळगाव

Teacher Constituency Election : मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना; नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

Jalgaon News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान होणार आहे. मतदानाची तयारी निवडणूक यंत्रणेने पूर्ण केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान होणार आहे. मतदानाची तयारी निवडणूक यंत्रणेने पूर्ण केली आहे. मंगळवारी (ता. २५) दुपारी सर्वच मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह अधिकारी व कर्मचारी पोलिस बंदोबस्तात रवाना झालेत. जिल्ह्यात निवडणुकीसाठी १३ हजार १२२ शिक्षक मतदार आहे. (Teacher Constituency Election)

त्यात ९ हजार ६७३ पुरुष, तर ३ हजार ४४९ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी १२० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, एक शिपाई व बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून, मंगळवारी कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचले.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात १, यावल तालुक्यात १, रावेर तालुक्यात १, मुक्ताईनगर तालुक्यात १, बोदवड तालुक्यात १, भुसावळ तालुक्यात २, जळगाव तालुक्यात ३, धरणगाव तालुक्यात १. (latest marathi news)

अमळनेर तालुक्यात २, पारोळा तालुक्यात १, एरंडोल तालुक्यात १, भडगाव तालुक्यात १, चाळीसगाव तालुक्यात २, पाचोरा तालुक्यात १, जामनेर तालुक्यात १, असे एकूण २० मतदान केंद्रे आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT