Abandoned material in a mobile shop. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेरमधील 4 दुकाने चोरट्यांनी फोडली

Jalgaon Crime : शटर व कुलूप तोडून चार दुकानांतून मोबाईल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शटर व कुलूप तोडून चार दुकानांतून मोबाईल, तांब्याच्या तारा व इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. शहरातील खड्डा जीनला लागून असलेल्या दुकानाजवळून एक इसम सकाळी फिरायला जात असताना, त्याला कपिल भावसार यांचे कपिल इलेक्ट्रिकल्स दुकानाचे वरचे अर्धे शटर कापले दिसून आले. त्याने दुकानदाराला घटना कळवली. ( Thieves broke into 4 shops in Amalner )

दुकानदाराने धाव घेऊन पाहिले असता, त्याच्या दुकानातील ग्राइण्डर मशीन, तांब्याच्या तारा इलेक्ट्रीकल साहित्य, असे दहा हजारांचे साहित्य चोरीला गेले. त्याच्या बाजूला असलेल्या दोन-तीन दुकानानंतर मयूर महाजन यांचे मयूर मोबाईल दुकानाच्या शटरचे एका बाजूचे कुलूप तोडून आतील टेबल सरकवला आणि दुकानातील दुरुस्तीला आलेले ८ ते १० मोबाईल, साधे १२ मोबाईल आणि ७ ते ८ हजार रुपयांचे मोबाईलचे साहित्य चोरून नेले.

मयूर मोबाईलच्या एक दुकानाच्या आड असलेल्या सय्यद इद्रीस यांचे सना इलेक्ट्रिकल्स दुकानाचेही कुलूप तोडून तांब्याच्या तारा व इतर साहित्य, असे दहा हजाराचे साहित्य चोरून नेले. तीन महिन्यात सना इलेक्ट्रीकल दुसऱ्यांदा फुटले आहे.

त्याचप्रमाणे बाजूला असलेले संगम मोबाईल दुकानही आधी मागच्या बाजूने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसल्यानंतर चोरट्याने शटरचे दोन्ही कुलूप तोडले, पण सेंटर लॉक न तुटल्याने चोरट्यांनी पळ काढला. याबाबत सय्यद इद्रिस यांनी पोलिसांत ऑनलाइन तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT