Loan  esakal
जळगाव

Jalgaon Crop Lone : हजारो शेतकरी पीककर्जापासून वंचितच; अनिष्ट तफावतीतील विकास सोसायटीतर्फे विलंब

Crop Lone : अनिष्ट तफावतीत गेलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांकडून पीक कर्जवाटप अधिकार काढून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःकडे घेतले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crop Lone : अनिष्ट तफावतीतील विकास सोसायटीच्या सभासदांना अद्यापही कर्जवाटपास विलंब होत आहे, तर दुसरीकडे मात्र इतर विकास सोसायटीमार्फत ८० टक्के पीक कर्जवाटप झाल्याने शेतकऱ्यांमध्ये विषमता निर्माण झाली आहे. अनिष्ट तफावतीत गेलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांकडून पीक कर्जवाटप अधिकार काढून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःकडे घेतले आहेत. ( Thousands of farmers are deprived of crop loan )

अमळनेर तालुक्यात अशा १४ संस्था असून, संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी बँकेचा भला मोठा अर्ज, त्यावर जामीनदार सह्या व इतर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. पीक कर्जवाटप सुरू करून महिना उलटला तरीही अनिष्ट तफावतीतील सोसायटीच्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज वाटप झालेले नाही.

दुसरीकडे मात्र इतर विकास सोसायटीच्या शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू झाले असून, ८० टक्के वाटप झाल्याने त्या शेतकऱ्यांचे बियाणे खरेदी, मशागत, खते खरेदी सुरू झाली आहे. कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांची शेतीकामे केव्हा सुरू होतील?, वेळेवर पेरणी होईल का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. (latest marathi news)

''जिल्हा बँकेने निम्मे कर्ज रोखीने देण्याचा ठराव केला असला, तरी शेतकऱ्यांना बँकेकडून बँकेच्याच मायक्रो एटीएमने पैसे दिले जात आहेत. त्यात २५ हजार रुपयांसाठी २० रुपये जादा फी मोजावी लागते आहे. एका वेळी फक्त ७५ हजार रुपये मिळू शकतात. अमळनेर तालुक्यात अनिष्ट तफावतीच्या सोसायटीच्या २२०० शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्जवाटप करायचे आहे. मात्र, १२०० शेतकऱ्यांनीच अर्ज भरले आहेत. ते जिल्हा शाखेकडे रवाना करण्यात आले आहेत. मंजुरी आल्यावर कर्जवाटप केले जाईल.''-अनिल अहिरराव, उपविभागीय व्यवस्थापक, अमळनेर

''बाजार समितीच्या शाखेकडे ३५ विकास सोसायट्या आहेत. ८० टक्के कर्ज म्हणजे १८ कोटी रुपये वाटप झाले आहेत आणि जिल्हा बँकेच्या धोरणानुसारच मायक्रो एटीएमचे २० रुपये चार्ज लावले जात आहेत.''- सागर पाटील, बाजार समिती शाखा व्यवस्थापक, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील ५ हजार ५८१ खाती कर्जमाफीसाठी पोर्टलवर अपलोड: दिलीप वळसे पाटील; उर्वरित खाती तातडीने अपलोड करा!

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

SCROLL FOR NEXT