MSRTC Bus esakal
जळगाव

जळगाव ते पंढरपूर बससेवा सुरू; अडीच वर्षानंतर कायमस्वरूपी प्रवाशांची सोय

कैलास शिंदे

जळगाव : पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना जळगाव येथून थेट पंढरपूर बससेवा (Bus Service) सुरू करण्यात आली आहे. अडीच वर्षानंतर कायमस्वरूपी बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे महामंडळातर्फे (MSRTC) सांगण्यात आले आहे. (Jalgaon to Pandharpur bus service started Jalgaon News)

्एसटी महामंडळातर्फे पंढरपूर येथे भाविकांना दर्शनासाठी जळगाव ते पंढरपूर बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोना संसर्गाच्या काळात ही बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर ही बससेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दिवाळीच्या काळात ही सेवा सुरू करण्यात येणार होती मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही सेवा लांबणीवर पडली. आता आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तब्बल अडीच वर्षानंतर भाविकांना आता पंढरपूरसाठी थेट बस जळगाव आगारातून उपलब्ध होणार आहे.

१५ जूनपासून ही सेवा सुरू झाली असून सकाळी आठ वाजता जळगाव बसस्थानकातून ही बस पंढरपूरसाठी सोडण्यात आली. आगारातून प्रवाशांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बससेवा सुरू करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक पंकज महाजन, वाहतूक निरीक्षक मनोज तिवारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. औरंगाबाद, नगर, टेंभूर्णीमार्गे ही बस पंढरपूर येथे जाईल. तर पंढरपूर येथून पहाटे पाच वाजता जळगावसाठी ही बस रवाना होईल. विविध सवलतधारक प्रवाशांनाही या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. या शिवाय पंढरपूर आषाढी यात्रेसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही जळगाव येथील आगार व्यवस्थापक पंकज महाजन यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT