Pothole (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील प्रवास खडतर; खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

Jalgaon : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचा अद्याप मुहूर्त निघत नसल्याने या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या मणक्यांना चांगले झटके बसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचा अद्याप मुहूर्त निघत नसल्याने या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांच्या मणक्यांना चांगले झटके बसत आहे. तसेच अपघातांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीची मुदत होत आली असली तरी अद्याप काम सुरू झालेले दिसत नाही. त्यामुळे जनतेत नाराजी आहे.

काही दिवसांपूर्वी एक, दोन अपघात घडल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी थेट पोलिस ठाणे गाठून संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. (Travel on Barhanpur Ankleshwar highway is tough)

त्यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून रस्ता दुरुस्ती करावी, असे सांगितले तर माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनीही अधिकाऱ्यांना फोन केल्याने रस्त्याच्या मधोमध असलेली खोल चारी बुजण्यात आली. परंतु मंजूर असलेले संपूर्ण रस्त्याचे दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही.

या महामार्गाची तळोदा ते चोरवड मध्य प्रदेश सीमापर्यंतच्या दुरुस्तीसाठी ६० ते ६५ कोटी रुपये मंजूर झाल्याचे माहिती आहे. या कामाची मुदत २० जुलै २०२३ पासून २० जुलै २०२४ पर्यंत आहे. पण चोपडा, यावल, रावेर तालुक्यात अद्यापही या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरवात झालेली नाही.

त्यामुळे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात तर होतच आहेत. पण वाहनधारकांच्या मणक्यांना झटके बसून पाठदुखी, कंबरदुखीचे त्रास जाणवत आहेत. त्याचे संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना काही देणेघेणे नसल्याचे दिसते.

बऱ्हाणपूर -अंकलेश्वर हा महामार्ग खानदेशाची जीवन वाहिनी आहे. चोपडा ते बऱ्हाणपूरपर्यंत हा महामार्ग केळीच्या वाहतुकीसाठी ओळखला जातो. महामार्ग खराब झाल्याने परराज्यातील अनेक ट्रकचालक या मार्गावर केळी भरण्यास नकार देत आहेत.

हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) यांच्याकडे जानेवारी २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांनी वर्ग केला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उदासीन धोरणामुळे या महामार्गाचे तीनतेरा वाजले आहेत. केंद्र सरकारकडून या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जून २०२३ मध्ये ६० कोटी तेरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु अजूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

थातूरमातूर बुजले खड्डे

नागरिकांनी उपोषण केल्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. रावेर ते सावदा दरम्यान अनेक ठिकाणी बुजलेले खड्डे पुन्हा उघडलेले आहेत, त्यामुळे मक्तेदार श्याम सुंदर कंट्रक्शन यांच्या कामाविषयी साशंकता निर्माण होत आहे.

...तर पुन्हा उपोषण

महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सावदा येथील तापी जर्नलिस्ट असोसिएशनने १७ ऑक्टोबर २०२३ ला उपोषण केले होते. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता चंदन गायकवाड तसेच श्‍याम सुंदर कन्ट्रक्शनचे प्रतिनिधी गणेश मूर्ती यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देत ९ फेब्रुवारीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासित केले होते.

परंतु अजून देखील रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नसल्याने ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन पुन्हा उपोषण करेल, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.

"महामार्गाचे मक्तेदार श्यामसुंदर कन्स्ट्रक्शन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता चंदन गायकवाड यांनी महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे लेखी पत्र दिले आहे. परंतु आजपावतो कोणतेही काम झालेले नाही. काम सुरू करा; अन्यथा संबधितांविरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू."- श्‍याम पाटील, अध्यक्ष, ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट असोसिएशन, सावदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT