crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वढोदा येथे घरफोडी; दोघांना अडावद येथून अटक

Jalgaon Crime : तालुक्यातील वढोदा येथे एका घराच्या दरवाज्याला लावलेला पत्रा उचकावून चोरट्याने कपाटातील लॉकरमधील रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल, असा एकूण दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल लांबविला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील वढोदा येथे एका घराच्या दरवाज्याला लावलेला पत्रा उचकावून चोरट्याने कपाटातील लॉकरमधील रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल, असा एकूण दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. या चोरी प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकाने दोन संशयितांना बुधवारी (ता. १) अडावद (ता. चोपडा) येथून अटक केली. त्या दोघांनी चोरीची कबुली दिली असून, बुधवारी दोघांना यावल न्यायालयाने शनिवार (ता. ४)पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (jalgaon two arrested in Burglary at Wathoda )

वढोदा (ता. यावल) येथील प्रदीप दिनकर सपकाळे रविवारी(ता. २८) रात्री कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते. सोमवारी पहाटेपूर्वी त्यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या दरवाज्याला अडकन म्हणून लावलेला पत्रा वाकवून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटाचे लॉक तोडून रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल, असा एकूण दोन लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत सोमवारी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. (latest marathi news)

पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, महेश महाजन, भगवान पाटील, ईश्वर पाटील, गोरखनाथ बागूल, महेश सोमवंशी, उमेश महाजन यांनी अडावद (ता. चोपडा) येथून रेवलसिंग ऊर्फ सावन गुलसिंग बारेला (रा. जामन्या, ता. भगवानपुरा, मध्य प्रदेश) व मेगसिंग ऊर्फ सेवकराम दलसिंग सोलंकी (रा. बोकरान्या, ता. भगवानपुरा, मध्य प्रदेश) या दोघांना अटक केली.

त्या दोघांनी चोरीची कबुली दिली असून, दोघांना गुरुवारी (ता. २) येथील न्यायालयात न्यायधीश व्ही. एस. डामरे यांच्यासमोर हजर केले असता, दोघांना येत्या शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT